SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात २८ वर्षांची परंपरा असलेल्या 'ईद फेस्टिव्हल'चे दिमाखात उद्घाटनबिद्री येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा छापा; १.५३ लाखांचा अवैध गुटखा जप्तनेदरलॅन्ड्सच्या तज्ज्ञांकडून ‘गोकुळ’च्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना अत्याधुनिक प्रशिक्षणवि‌द्यापीठ वि‌द्यार्थिनी वसतिगृहात हॉस्टेल डे उत्साहात31 मार्चपर्यंत वसुलीचे उद्दीष्ठ पुर्ण करा : आयुक्त के.मंजूलक्ष्मीपर्यटन संचालनालयातर्फे सात दिवसीय नमो पर्यटन कौशल्य प्रशिक्षण योजना‘अमृतपेठ – थेट बाजारपेठ’ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची सदिच्छा भेटस्लिपर कोच बसची 31 मार्चपर्यंत तपासणी करण्याचे आवाहनपर्यटकांची गैरसोय टाळा; गॅस टंचाईवरून कोल्हापुरात सकल हिंदू समाज आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनचंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेचे बुधवारपासून आयोजन : परिवहन सभापती सत्यजित जाधव, राजेंद्र कुरणे यांची माहिती

जाहिरात

 

नेदरलॅन्ड्सच्या तज्ज्ञांकडून ‘गोकुळ’च्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना अत्याधुनिक प्रशिक्षण

schedule17 Mar 26 person by visibility 112 categoryउद्योग

🔸आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मार्गदर्शनामुळे पशुधन विकासाला चालना; शेतकऱ्यांना होणार थेट लाभ : नविद मुश्रीफ

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) यांच्यावतीने दुग्ध व्यवसाय आणि पशुधन व्यवस्थापन क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. नेदरलँड्समधील पी.यू.एम. (प्रोजेक्ट आउट सेंडर मॅनेजर्स) या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने गोकुळ दूध संघातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेले दहा दिवसांचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे.

या प्रशिक्षणासाठी नेदरलँड्सचे अनुभवी पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. एर्विन द. विथ यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते विकास कक्ष, ताराबाई पार्क येथे डॉ. विथ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक अजित नरके, प्रकाश पाटील तसेच संघाचे अधिकारी उपस्थित होते.

गोकुळ संघाने पी.यू.एम. संस्था नेदरलँड्स सोबत १८ डिसेंबर २०२५ ते १८ डिसेंबर २०२७ या दोन वर्षाच्या कालावधीसाठी सहकार्य (फ्रेमवर्क) करार केला असून या करारानुसार दर दोन महिन्यांनी विविध विषयांतील तज्ज्ञ गोकुळ संघात येऊन मार्गदर्शन करणार आहेत. यामुळे गोकुळच्या पशुवैद्यकीय पशुपालन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे मार्गदर्शन मिळणार आहे.

या करारांतर्गत पहिल्या टप्प्यातील “जनावरांची दूध उत्पादकता वाढविणे व गोठा व्यवस्थापन” या विषयावर दि. ६ मार्च ते १७ मार्च २०२६ या कालावधीत प्रशिक्षणाचे आयोजन स्व. आनंदराव पाटील-चुयेकर प्रशिक्षण केंद्र, ताराबाई पार्क येथे पार पडले. या प्रशिक्षणात संघातील एकूण ४३ पशुवैद्यकीय अधिकारी सहभागी होते. प्रशिक्षणा दरम्यान गोकुळ मार्फत सद्या चालेल्या पशुसंवर्धन विभागातील कामकाज तसेच दूध उत्पादक पातळीवरील अडचणी यांची माहिती देण्यात आली. तसेच दूध उत्पादक स्तरावरील अडचणीवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन व उपाय सुचवले. प्रत्यक्ष गोठा भेटी, प्रात्यक्षिके, सादरीकरणे (प्रेझेंटेशन) आणि गटचर्चा यांच्या माध्यमातून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आली.

तसेच या प्रशिक्षणादरम्यान जनावरांची उत्पादकता वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना, जनावरांच्या हालचाली व आरोग्य निरीक्षण, वांझपणाच्या समस्या व त्यावरील उपाय, वासरांचे संगोपन, जनावरांना योग्य वेळेत माजावर आणण्याची कार्यपद्धती, गोठा व्यवस्थापनातील सुधारणा तसेच उष्णतेमुळे जनावरांवर होणाऱ्या ताणाचे व्यवस्थापन या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

 याशिवाय, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन कसे करावे, त्यांच्या अडचणी ओळखून त्वरित उपाययोजना कशा कराव्यात याबाबतही प्रशिक्षण देण्यात आले. या उपक्रमामुळे गोकुळ संघातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे तांत्रिक ज्ञान अद्ययावत होणार असून त्याचा थेट फायदा जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. उत्पादनवाढ, जनावरांचे आरोग्य सुधारणा आणि गोठा व्यवस्थापनातील कार्यक्षमता वाढ यामुळे दुग्धव्यवसाय अधिक सक्षम व फायदेशीर होण्यास मदत होणार आहे.

पुढील दोन वर्षांच्या कालावधीत या कराराअंतर्गत पशुधन व्यवस्थापन, प्रजनन क्षमता सुधारणा, जनावरांचे आरोग्य, खाद्य व चारा व्यवस्थापन तसेच विपणन व धोरणात्मक नियोजन या विषयांवरही पी.यू.एम.कडून तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे.

यावेळी गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, गोकुळ संघाने नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. मात्र, मागील काही वर्षांत पशुपालन क्षेत्रात काही आव्हाने जाणवत होती. विशेषतः जनावरांमध्ये वांझपणाचे प्रमाण वाढणे, दूध उत्पादनात अपेक्षित वाढ न होणे, गोठा व्यवस्थापनातील काही त्रुटी तसेच उष्णतेमुळे जनावरांच्या आरोग्यावर होणारा ताण या समस्या शेतकऱ्यांसमोर होत्या. या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्याचा निर्णय आम्ही घेतला. गोकुळ दूध संघाचे पशुवैद्यकीय क्षेत्रातील कामकाज, शिस्तबद्ध सेवा आणि शेतकऱ्यांशी असलेली बांधिलकी पाहूनच नेदरलँड्समधील पी.यू.एम. या संस्थेने गोकुळची निवड केली, ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. ही निवड गोकुळच्या कामाची आंतरराष्ट्रीय पातळीवरील दखल असल्याचे द्योतक आहे.

  या उपक्रमामुळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे तांत्रिक ज्ञान वाढून शेतकऱ्यांना अधिक प्रभावी मार्गदर्शन मिळणार असून दूध उत्पादन वाढ, पशुधन विकासाला चालना मिळण्यास निश्चित मदत होईल. असा आम्हाला विश्वास आहे. भविष्यातही अशा आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या माध्यमातून गोकुळ संघ अधिक सक्षम, आधुनिक व स्पर्धात्मक करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.

याप्रसंगी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक अजित नरके, प्रकाश पाटील, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, व्यवस्थापक पशुसंवर्धन डॉ.प्रकाश साळुंखे, डॉ.दयावर्धन कामत, डॉ.प्रकाश दळवी, डॉ.तानाजी कडवेकर, डॉ.सुभाष गोरे, डॉ.रणजीत चोपडे,जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes