SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात २८ वर्षांची परंपरा असलेल्या 'ईद फेस्टिव्हल'चे दिमाखात उद्घाटनबिद्री येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा छापा; १.५३ लाखांचा अवैध गुटखा जप्तनेदरलॅन्ड्सच्या तज्ज्ञांकडून ‘गोकुळ’च्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना अत्याधुनिक प्रशिक्षणवि‌द्यापीठ वि‌द्यार्थिनी वसतिगृहात हॉस्टेल डे उत्साहात31 मार्चपर्यंत वसुलीचे उद्दीष्ठ पुर्ण करा : आयुक्त के.मंजूलक्ष्मीपर्यटन संचालनालयातर्फे सात दिवसीय नमो पर्यटन कौशल्य प्रशिक्षण योजना‘अमृतपेठ – थेट बाजारपेठ’ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची सदिच्छा भेटस्लिपर कोच बसची 31 मार्चपर्यंत तपासणी करण्याचे आवाहनपर्यटकांची गैरसोय टाळा; गॅस टंचाईवरून कोल्हापुरात सकल हिंदू समाज आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनचंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेचे बुधवारपासून आयोजन : परिवहन सभापती सत्यजित जाधव, राजेंद्र कुरणे यांची माहिती

जाहिरात

 

बिद्री येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा छापा; १.५३ लाखांचा अवैध गुटखा जप्त

schedule17 Mar 26 person by visibility 202 categoryगुन्हे

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक  योगेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बिद्री (ता. कागल) येथे मोठी कारवाई केली असून, १,५३,५५२ रुपये किमतीचा अवैध गुटखा साठा जप्त केला आहे.

 राज्य शासनाने गुटखा विक्री व साठवणुकीवर बंदी घातली असतानाही, बिद्री-कोल्हापूर रोडवरील मटण मार्केट समोरील 'विघ्नहर्ता ट्रेडर्स' या दुकानात बेकायदेशीर विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपनिरीक्षक जालींदर जाधव यांच्या पथकाला मिळाली होती.


मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने १७ मार्च २०२६ रोजी सदर दुकानावर छापा टाकला. यावेळी संशयित आरोपी उदय भिकाजी ढेकळे (वय ३९, रा. मजरे कासारवाडा, ता. राधानगरी) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातून विविध कंपन्यांचा गुटखा आणि सुगंधी सुपारी असा एकूण १ लाख ५३ हजार ५५२ रुपयांचा मुद्देमाल कायदेशीर पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे.

 संशयित आरोपीला पुढील कारवाईसाठी मुरगुड पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही यशस्वी कामगिरी पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पीएसआय जालींदर जाधव, अरविंद पाटील, विजय इंगळे, रोहीत मर्दाने आणि त्यांच्या पथकाने पार पाडली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes