SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात २८ वर्षांची परंपरा असलेल्या 'ईद फेस्टिव्हल'चे दिमाखात उद्घाटनबिद्री येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा छापा; १.५३ लाखांचा अवैध गुटखा जप्तनेदरलॅन्ड्सच्या तज्ज्ञांकडून ‘गोकुळ’च्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना अत्याधुनिक प्रशिक्षणवि‌द्यापीठ वि‌द्यार्थिनी वसतिगृहात हॉस्टेल डे उत्साहात31 मार्चपर्यंत वसुलीचे उद्दीष्ठ पुर्ण करा : आयुक्त के.मंजूलक्ष्मीपर्यटन संचालनालयातर्फे सात दिवसीय नमो पर्यटन कौशल्य प्रशिक्षण योजना‘अमृतपेठ – थेट बाजारपेठ’ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची सदिच्छा भेटस्लिपर कोच बसची 31 मार्चपर्यंत तपासणी करण्याचे आवाहनपर्यटकांची गैरसोय टाळा; गॅस टंचाईवरून कोल्हापुरात सकल हिंदू समाज आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनचंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेचे बुधवारपासून आयोजन : परिवहन सभापती सत्यजित जाधव, राजेंद्र कुरणे यांची माहिती

जाहिरात

 

कोल्हापुरात २८ वर्षांची परंपरा असलेल्या 'ईद फेस्टिव्हल'चे दिमाखात उद्घाटन

schedule17 Mar 26 person by visibility 205 categoryसामाजिक

कोल्हापूर: येथील ऐतिहासिक बिंदू चौक मैदानावर गेली २८ वर्षे यशस्वी परंपरा असलेल्या 'ईद फेस्टिव्हल २०२६'चे उद्घाटन कोल्हापूर महानगरपालिकेचे उपमहापौर अक्षय जरग यांच्या हस्ते मंगळवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना (शिंदे गट) कोल्हापूर महानगरपालिकेचे गटनेते शारंगधर देशमुख होते. 

या फेस्टिव्हलचे वैशिष्ट्य म्हणजे 'ना नफा ना तोटा' या तत्त्वावर नागरिकांना अत्यावश्यक वस्तू एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने ड्रायफ्रूट्स, मसाले, अत्तर, हैद्राबादी व लखनवी इमिटेशन ज्वेलरी, कॉस्मेटिक्स आणि क्रॉकरी सेट अशा विविध वस्तूंचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत.

या उद्घाटन सोहळ्याचे औचित्य साधून नगरसेवक आश्किन आजरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना  उन्हापासून संरक्षणासाठी मोफत पांढऱ्या टोप्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला परिवहन सभापती सत्यजित जाधव, महिला व बालकल्याण सभापती कौसर बागवान, ऋतुराज क्षीरसागर, नगरसेवक अजय इंगवले, अर्जुन माने, संजय कदम, तसेच नगरसेविका स्वालिया बागवान, अनुराधा मुळीक, दिलशाद मुल्ला, निलोफर आजरेकर यांच्यासह नेहरू हायस्कूलचे चेअरमन रफिक शेख आणि मुस्लिम बोर्डिंगचे संचालक हाजी लियाकत मुजावर, हाजी जहांगीर अत्तार, हाजी फारुख पटवेगार उपस्थित होते.

या फेस्टिव्हलची यशस्वी धुरा संस्थापक गणी आजरेकर आणि त्यांची कमिटी सांभाळत असून, कार्यक्रमाचे नियोजन अशफाक आजरेकर यांनी केले. उद्घाटन प्रसंगी कमिटीचे सदस्य शौकत बागवान, रहिम महात, निलेश भोसले, मुस्तफा मणेर, इजाज मोमीन यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब मुल्ला, सत्तार मुल्ला, युवराज कुरणे आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes