कोल्हापुरात बाजारात वडाप घुसल्याने भीषण अपघात; एका महिलेचा मृत्यू, दोन महिला जखमी
schedule14 Oct 25 person by visibility 312 categoryगुन्हे

कोल्हापूर : कोल्हापुरातील गंगावेश परिसरातील बाजारपेठेत वडाप वाहतूक करणारी कार घुसल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. तर आणखी काही महिला गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृत अन् जखमी महिलांची नावे अद्याप समजू शकली नाहीत. आज, मंगळवारी (दि. १४) सकाळी साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिस पुढील तपास करीत आहेत. दरम्यान घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
गंगावेश परिसरात शाहू उद्यान परिसरात भाजी मडंईचा बाजार भरतो. भाजी मंडई परिसरात नेहमी वर्दळ असते. आज बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होती . अशातच एक वडाप वाहतूक करणारी कार बाजारात घुसल्याने भीषण अपघात झाला. वळण घेत असताना चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट बाजारात घुसली. यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर दोन महिला जखमी झाल्याचे समजते.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिस पुढील तपास करीत आहेत.