जागतिक अन्न दिनानिमित्त विद्यापीठात १५ ऑक्टोबरपासून प्रदर्शन, फेअर ट्रेड कार्यक्रम
schedule13 Oct 25 person by visibility 112 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान अधिविभागामार्फत जागतिक अन्न दिनानिमित्त (World Food Day-2025) येत्या बुधवारपासून (दि. १५) दोन दिवस विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन अधिविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
बुधवारी (दि. १५) शाश्वत अन्न प्रणालीवर पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 'शेती ते शाश्वत भविष्य' (Farm to Future) या संकल्पनेवर आधारित 'शाश्वत अन्न प्रणाली' (Sustainable Food System) विषयावर एम.एस्सी. विद्यार्थ्यांमार्फत पोस्टर प्रदर्शन करून अन्न प्रणालीतील प्रत्येक घटकाच्या जबाबदारीविषयी माहिती देण्यात येईल.
गुरुवारी (दि.१६) अन्न व्यावसायिकांसाठी (FBOs), अन्न आणि औषध प्रशासन (FDA) यांच्या संयुक्त विद्यमाने मार्गदर्शन व जागरूकता कार्यक्रम आयोजित केला आहे. शेतकरी, सर्व खाद्यपदार्थ व्यावसायिक, हॉटेल मालक संघ व सभासद, प्रक्रिया उद्योगांचे प्रतिनिधी, शासकीय संस्था व अधिकारी, विद्यार्थी, शिक्षण संस्था व कर्मचारी यांनी सुरक्षित, शाश्वत आणि न्यायपूर्ण अन्न प्रणालीसाठी जागरूकता निर्माण करणाऱ्या या महत्त्वपूर्ण उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान अधिविभागाचे प्रमुख डॉ. प्रवीणकुमार पाटील यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क: डॉ. पी. डी. पाटील (अधिविभागप्रमुख) ०२३१२६०९४१५, डॉ. अभिजीत अरुण गाताडे (९०२८७८५८०७), डॉ. हर्षवर्धन कांबळे (९९७५६५९२४६), डॉ. अश्विनी देशमुख (९३७३९३२२५५)