कोल्हापूर शहरातील भटके कुत्रे शेल्टर उभारणीसाठी महानगरपालिकेची ८ डिसेंबरला महत्त्वपूर्ण बैठक
schedule03 Dec 25 person by visibility 44 categoryमहानगरपालिका
◼️सर्व प्राणीप्रेमी, स्वयंसेवी संस्था व नागरिकांनी या बैठकीस उपस्थित राहण्याचे महापालिकेचे आवाहन
कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या SUO MOTO Writ Petition (Civil) No. 5 of 2015 मधील 07 नोव्हेंबर 2025 रोजीच्या आदेशानुसार तसेच नगरपरिषद प्रशासन संचालनालय, नवी मुंबई यांच्या 18 नोव्हेंबर 2025 रोजी आलेल्या निर्देशांनुसार शहरातील सर्व सार्वजनिक ठिकाणांवरून भटके कुत्रे शेल्टरमध्ये स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
या निर्देशांनुसार शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये, शाळा, दवाखाने, क्रीडासंकुले, बसस्थानक, रेल्वेस्टेशन, धार्मिक स्थळे, हेलीपॅड, विमानतळ आदी ठिकाणांवरील भटके कुत्रे सुरक्षित शेल्टरमध्ये नेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
भारतीय प्राणी कल्याण मंडळाने शेल्टर व्यवस्थापनासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्यानुसार महानगरपालिका शेल्टर उभारण्याचे काम हाती घेणार आहे. हे शेल्टर प्रभावीपणे चालवण्यासाठी नागरिक व प्राणीप्रेमी यांच्या सहकार्याची गरज आहे.
यासंदर्भातील चर्चा व नियोजनासाठी सोमवार, दि. 08 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12.30 वा. प्रतिभानगर येथील वि. स. खांडेकर शाळेत बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी शहरातील सर्व प्राणीप्रेमी, स्वयंसेवी संस्था व नागरिकांनी या बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.