केआयटी मध्ये प्राध्यापकांसाठी ‘उद्योजकता व इनोव्हेशन’ कार्यशाळेचे उद्घाटन; एआयसीटीइ व शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेलचा पुढाकार
schedule28 Mar 25 person by visibility 432 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : सध्या राष्ट्रीय स्तरावर उद्योजकता व इनोवेशन्स या विषयाला घेऊन शासन स्तरावर ती मोठ्या प्रमाणामध्ये उपक्रम राबवले जात आहे विविध शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून तेथील शिक्षकांना प्रोत्साहित करण्यासाठी देशभरातील नावाजलेल्या ५0 संस्थांमध्ये फक्त प्राध्यापकांसाठी ’ उद्योजकता व इनोव्हेशन’ या विषयाला घेऊन कार्यशाळा आयोजित केली जात आहे. त्यातील एक कार्यशाळा महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील केआयटीज अभियांत्रिकी ( प्रदत्त स्वायत्त ) महाविद्यालयामध्ये संपन्न होत आहे. ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेलच्या वतीने प्राध्यापकांच्यासाठी आयोजित पाच दिवसी कार्य शाळेचे आज २५ मार्च रोजी उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून टेक महिंद्रा लिमिटेडचे फंक्शन हेड असोसिएट वाईस प्रेसिडेंट इनोव्हेशन चे श्रीनिवास जेटलापल्ली हे उपस्थित होते.
या कार्यशाळेमध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध कंपन्यांचे कार्यकारी अधिकारी, समन्वयक, संचालक, राष्ट्रीय स्तरावरील विद्यापीठांचे प्राध्यापक, प्रत्यक्षात कार्यशाळेत सहभागी होऊन प्राध्यापकांना मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये नर्मदा मॅनेजमेंटचे मुख्य सल्लागार रणधीर पटवर्धन, आयआयटी धारवाडच्या रिसर्च पार्कचे मुख्य अधिकारी श्री रक्षित कल्याणी, महिंद्रा युनिव्हर्सिटीचे इस्माईल अकबानी, इंडोवेशन सेंटर मुंबईचे उमेश राठोड, माय ई प्लॅटफॉर्म डिजिटल मार्केटिंग एजन्सी चे यशांग गोकानी, अपेक्स को फाउंडर, सिरी चे सचिन कुंभोजे, केआयटी चे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी, इव्होल्विग एक्स प्रायव्हेट लिमिटेड चे अमोल मिटावे,स्टार्टअप लाइफस्टइल हब पुणे चे अर्जुन पांचाळ,अॅक्युअर्स आयपी केअर चे अविनाश ठाकूर अशा अनुभवी व तज्ञ मान्यवरां चे मार्गदर्शन सहभागी प्राध्यापकांना मिळणार आहे.
संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली यांच्या हस्ते उद्घाटक श्रीनिवास जेटलापल्ली स्वागत करण्यात आले. त्यावेळी,उपाध्यक्ष श्री सचिन मेनन सचिव दीपक चौगुले, विश्वस्त दिलीप जोशी, श्री.भरत पाटील आणि संचालक डॉ. मोहन वनरोट्टी उपस्थित होते.
केआयटीज आयआरएफ चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर आरळी ,इंक्युबेशन मॅनेजर, देवेंद्र पाठक, इंक्युबेशन असोसिएट, पार्थ हजारे, अंजुरी कुंभोजे, अधिष्ठाता, इंक्युबेशन इनोव्हेशन अँड लींकेजीस डॉ.सचिन शिंदे, ई-सेलच्या समन्वयक प्रा.विदुला वासकर, यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात मोलाची भूमिका बजावली.या कार्यशाळेसाठी महाराष्ट्र व कर्नाटकातील ३८ संस्थान मधून ५0 प्राध्यापक व संशोधकांनी सहभाग नोंदवलेला आहे. या कार्यशाळेमध्ये इनोव्हेशन, उद्योजकता, प्रश्न सोडवण्याची पद्धत, मार्केटिंग, स्टार्टअप इकोसिस्टीम या विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करून घेतली जाणार आहेत.