SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
"ज्ञानेश कुमार तुरुंगात जाणार, २०२४ ची लोकसभा निवडणूक अवैध!" – दिल्लीच्या रामलीला मैदानावर ‘इंडिया’ आघाडीच्या महारॅलीत राहुल गांधींचा घणाघातसडोली खालसा येथे तीन पानी जुगार अड्ड्यावर करवीर पोलिसांचा छापा; १३ जणांवर कारवाई, ३ लाख ८२ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्तडिजिटल युगात शिक्षणाच्या नव्या संधी : डॉ.ज्योती जाधवविद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर; चिपरी येथे अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन कर्तृत्वाने कार्यक्षेत्र समृद्ध करणारे डॉ. भोसले खऱ्या अर्थाने 'भाग्यवान'! : डॉ. यशवंत पाटणेजाधववाडीतील श्री दत्त मंदिर इमारत नूतनीकरण कामाचा लोकार्पण सोहळा उत्साहातदिवाळीच्या आनंदात सामाजिक भान जपत चेतना, स्वयंम् व सिद्धगिरीच्या विद्यार्थ्यांनी निर्मित केलेल्या वस्तूंची खरेदी करा; मान्यवरांचे आवाहनमान्यवरांच्या सदिच्छा भेटी अन् आशीर्वाद; नवनिर्वाचित आमदार कौस्तुभ गावडे यांचा कोल्हापूर जिल्ह्यात आभार दौरा!जागतिक शाकाहारी दिन: आरोग्याचा आणि दयाळूपणाचा संदेशभूजल विभागाकडून जोगमवाडी येथे वनराई बंधारा निर्मिती

जाहिरात

 

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर; चिपरी येथे अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन

schedule01 Nov 26 person by visibility 200 categoryशैक्षणिक

जयसिंगपूर :  लहान वयातच मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होणे आवश्यक असून, बालशिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी शासनाकडून विशेष पुढाकार घेतला जात आहे. शिरोळ तालुक्यातील प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी यापुढेही निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.

चिपरी येथे ११ लाख २४ हजार रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या अंगणवाडी क्रमांक ३५९ च्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. यावेळी ते बोलत होते.

बालवय हा मुलांच्या आयुष्यातील जडणघडणीचा महत्त्वाचा टप्पा असतो. याच काळात मुलांच्या बौद्धिक, शारीरिक आणि सामाजिक विकासाचा पाया घातला जातो. त्यामुळे अंगणवाड्यांमध्ये मुलांना पोषक वातावरण, आवश्यक शैक्षणिक सुविधा आणि दर्जेदार शिक्षण मिळणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील बालकांनाही शहरातील मुलांप्रमाणे चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने शासन विविध विकासकामांना प्राधान्य देत आहे.
नवीन अंगणवाडी इमारतीमुळे चिपरी येथील लहान बालकांना शिक्षण आणि पूर्वप्राथमिक संस्कारांसाठी हक्काची, सुरक्षित व सुविधायुक्त जागा उपलब्ध झाली आहे. अंगणवाडीच्या माध्यमातून बालकांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या आरोग्य आणि पोषणाकडेही लक्ष दिले जाणार असल्याचे आमदार यड्रावकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.

या उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या प्रचिता कोळी, माजी उपसरपंच अभय पाटील, माजी सरपंच शिवाजी बेडगे, बाळासाहेब पाटील, सुजित बेडगे, म्हाळू गावडे, रामा गावडे, दीपिका परीट, प्रशासक अनिल ओमासे, ग्रामविकास अधिकारी कोळी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes