SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात कोणतीही व्यावसायिक वाढ होणार नाहीभाजप युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांची दिल्ली विद्यापीठाला भेट, महाविद्यालयीन निवडणुकीची कार्यपद्धती घेतली जाणूनप्रा. वसिफा कोतवाल यांना डॉक्टरेट ​"६३ वर्षांची उज्ज्वल परंपरा अन् नवी झेप! गोकुळच्या वर्धापन दिनानिमित्त 'गोकुळ आईस्क्रीम' लाँच आणि बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन"'पालकत्वाचा लढा होईल सोपा; पद्माराजे हायस्कूलचा मदतीचा हात!'स्वच्छ कोल्हापूरसाठी महापालिका सरसावली; सुभाषनगर आणि वर्षानगर परिसरात राबवली धडक स्वच्छता मोहीम!वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला स्वायतत्ता देण्यासाठी समिती स्थापनवरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उद्ध्वस्त; शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, सिलिंडरचा साठा जप्त!धनगर आरक्षणासाठी महाधिवक्ता यांच्यासोबत बैठक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजेव्हा भारतीय पडदा पहिल्यांदा बोलू लागला...

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्ह्यातील घटना : गॅस गिझरच्या गळतीने नवदांम्पत्याने गमावले प्राण

schedule16 Jun 25 person by visibility 749 categoryगुन्हे

कोल्हापूर :  बाथरुममधील गॅस गिझरमध्ये गळती होऊन   सागर सुरेश कळमकर (वय ३२), आणि त्यांची पत्नी सुषमा करमळकर (वय २६ दोघेही रा. मूळ गाव शिवाजीनगर आजरा) या दांपत्याचा मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात घडली.

 याबाबत आजरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून शवविच्छेदनाच्या अहवालानंतर मृत्यू कारण स्पष्ट होईल.  त्यांच्या दुर्दवी मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे. 

 सागर आणि सुषमा यांचा विवाह २० मे रोजी झाला होता. काल रविवारी (ता. १५) दोघे पती पत्नी आंबोलीला फिरण्यासाठी गेले होते. त्यानंतर घरी परतले. सोमवारी त्याचे मित्र सागरला कॉल करत होते. पण त्यांचा फोन बंद होता.

त्यांचे मित्र आज सोमवारी सकाळी बुरुडेपैकी भावेश्रवरी कॉलनीतील घरी भेटण्यासाठी गेले. घराच्या समोरील दरवाजाला किल्ली अडकवलेली होती आणि दरवाजा उघडा होता. ते आत गेले असता गॅसचा वास येत होता. त्यावेळी दोघे बाथरुममध्ये पडले होते. दोघांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले.  दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes