कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) संघाशी सलग्न दूध उत्पादक शेतकऱ्यांना म्हैस व गाय दूध खरेदी दरामध्ये दिंनाक ११/०२/२०२३ इ.रोजी पासुन संघाने सध्याचे म्हैस व गाय दूध खरेदी दरामध्ये वाढ केलेली आहे. त्यास अनुसरून म्हैस दुधासाठी सरासरी प्रतिलिटर २ रूपये व गाय दुधासाठी सरासरी प्रतिलिटर २ रूपये वाढ केलेली आहे. दि.०९/०२/२०२३ इ.रोजीच्या संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये निर्णय घेण्यात आला आहे.अशी माहिती संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांनी दिली .
तरी दि.११ फेब्रुवारी रोजी पासून म्हैस दूध खरेदी दर ६.० फॅट व ९.० एस.एन.एफ प्रतिचे दुधास प्रतिलिटर रूपये ४९.५० दर राहिल व गाय दूध खरेदी दर ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ प्रतिचे दुधास प्रतिलिटर रूपये ३७.००असा दर राहिल अशी माहिती पाटील यांनी दिली.
चेअरमन विश्वास पाटील म्हणाले की दूध उत्पादकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते त्यांचा उत्पादन खर्च देखील वाढला आहे. ही दर वाढ केल्यामुळे दूध उत्पादकांना फायदा होणार असून शेतकऱ्यांचा दूधव्यवसाय वाढण्यास व आर्थिक उन्नती करता सहाय्यक ठरेल. सध्या गोकुळचे दैनंदिन दूध संकलन सरासरी १५ लाख लिटर्स असून यापैकी म्हैस दूध ८लाख ५०हजार लिटर्स व गाय दूध ६ लाख ५०हजार लिटर्स इतके आहे. या दूधदर वाढीमुळे दररोज सरासरी ३० लाख रुपये म्हणजेच प्रती महिना ९ कोटी रुपये रक्कम गोकुळच्या दूध उत्पादकांना दूधबिलापोटी अतिरिक्त मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.