SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पोषण अभियानात कोल्हापूरचा तिसरा क्रमांककोल्हापूरच्या विकासात महत्त्वपूर्ण वाटा विमानतळ उचलेल अशा सेवा आणि सुविधा उभाराव्यातस्मार्ट मीटर बसविणे सक्तीचे करु नये कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची महावितरणकडे मागणीकोल्हापुरात 'माझं शहर, माझी जबाबदारी' स्वच्छता अभियान यशस्वी; महापौर रूपाराणी निकम यांनी मानले कोल्हापूरकरांचे आभारप्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये 'मराठी राजभाषा दिन' उत्साहात साजराराष्ट्रीय विज्ञान दिन: विज्ञानाचा उत्सव आणि प्रगतीची वाटचालसाखर कारखान्यांना विशेष आर्थिक पॅकेज द्या : आमदार सतेज पाटील यांची मागणी : विधिमंडळात लक्षवेधीद्वारे वेधले लक्षघराघरात अस्मितेसोबत मराठी ज्ञानभाषा करणेमायमराठीच्या उद्याच्या भविष्यासाठी आवश्यकमहास्वच्छता मोहीमेत 30 टन कचरा संकलित; स्वच्छता मोहिमेत स्वयंसेवी संस्था, नागरिक व अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभागघरफाळा थकबाकीपोटी मनीषा नगर येथील बारबेल्स जीम ऍ़न्ड फिटनेस सेंटर सील

जाहिरात

 

स्मार्ट मीटर बसविणे सक्तीचे करु नये कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची महावितरणकडे मागणी

schedule28 Feb 26 person by visibility 129 categoryउद्योग

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) कडून संपूर्ण महाराष्ट्रात स्मार्ट मीटर जोडणीचे काम सुरु आहे. सदर स्मार्ट मीटर विरोधात वीज ग्राहकांमध्ये प्रचंड असंतोष असून स्मार्ट मीटर बसविणेची सक्ती ग्राहकांना करु नये अशी मागणी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या शिष्टमंडळाने महावितरणचे कार्यकारी अभियंता अशोक जाधव यांच्याकडे निवेदनाव्दारे केली.

यावेळी चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे म्हणाले, वीज ग्राहकांच्या अनुपस्थितीत स्मार्ट मीटर बसविणेचे प्रकार सध्या सर्वत्र घडत आहेत. सदर स्मार्ट मीटर जोडणे पूर्वी संबंधित अर्जावर जुन्या मीटरचा क्रमांक, शेवटचे रिडींग, बदलत असलेल्या नवीन स्मार्ट मीटरचा क्रमांक आणि सुरुवातीचे रिडींग, वीज ग्राहकाचे नाव, सही, मोबाईल नं. व इतर माहिती नोंदवून घ्यावी मगच स्मार्ट मीटर जोडावे. सदर वीज ग्राहकाची परवानगी नसेल तर स्मार्ट मीटर जोडू नये. वीज बिलाची बचत होणेसाठी वीज ग्राहकांनी सोलर बसवला आहे. परंतु स्मार्ट मीटर जोडलेनंतर सोलर बसविलेल्या ग्राहक व इतरांना चुकीची व वाढीव बिले येत आहेत. बिलाबाबत माहिती मागितली असता संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्याकडून योग्य स्पष्टीकरण मिळत नाही. वसुली अधिकारी व कर्मचारी उध्दट भाषेत बोलतात.

 

 याबाबत लक्ष घालून ग्राहकांना आपल्या बिलाबाबत मार्गदर्शन मिळावे. तसेच महावितरणचा बिलिंग विभाग व वसुली विभाग यांच्यामध्ये समन्वन नाही. त्याचा ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो. बिल चुकीचे आलेनंतर अर्ज दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत संबंधित विभाग वाट न पाहता कनेक्शन काढून टाकण्यास उत्सुक असतात त्यावर आळा बसावा.

मानद सचिव अजित कोठारी म्हणाले, ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविणेची सक्ती करु नये असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला असताना सुध्दा महावितरणचे कर्मचारी स्मार्ट मीटर बसविणेची सक्ती केली जाते. वीज बिलातून बचत होणेसाठी आपण घरी सोलर बसविला आहे. सुरुवातीचे दोन तीन-महिने वीज बिल सरासरी आले. त्यानंतर मात्र बिले प्रचंड प्रमाणात वाढून आली आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या ‘पीएम- सूर्य घर’ या योजनेला यामुळे ब्रेक बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चुकीची आलेली मोठ्या रकमेची बिले एकरकमी भरण्याचा आग्रह वसुली विभागाकडून केली जातो. जादा आलेले बिल पुढील येणाऱ्या बिलातून वजा करुन दिले जाईल असे सांगितले जाते. परंतू या रकमा डेबिट होण्यास दोन वर्षांचा कालवधी लागते. सदर दुरुस्त झालेली फरकाची रक्कम चेकने लवकरात लवकर परत मिळावी.

अमर क्षीरसागर म्हणाले, नवीन स्मार्ट जोडताना जुन्या मीटरची थकबाकी शिल्लक नसल्याबाबत एनओसी ग्राहकांना मिळावी मगच स्मार्ट मीटर बसवावे. कारण काही प्रकरणात स्मार्ट मीटर बसविलेनंतर चार महिन्यानंतर जुन्या मीटरची थकबाकी बिले ग्राहकांना मिळत आहेत.

कोल्हापूर सोलर असोसिएशनचे अध्यक्ष अतुल होनोले म्हणाले, सोलर बसविलेनंतर पहिले दोन-तीन महिने इम्पोर्ट रिडींग त्या बिलात येते. एक्स्पोर्टचे रिडींग मात्र येत नाही. तसेच जनरेशन मीटर रिडींग देखील बिलात येत नाही. ज्या सोलर ग्राहकांची स्मार्ट मीटर च्या पूर्वीची नेट मीटर्स आहेत त्यांचे कित्येक महिने मीटर रीडिंग न घेतलेने अचानक मोठ्या रकमेची बिले अदा केली जातात त्यावर योग्य तोडगा काढावा.शिबिर आणि जनजागृती साठी असोसिसिएशन मदत करेल 

यावेळी महावितरणचे शहर विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक जाधव यांनी बिल चुकलेल्या ग्राहकांच्या शंका दूर करण्यासाठी पुढील आठवड्यात विशेष बिल दुरुस्ती बद्दलचे शिबिर आयोजित करु असे सांगितले. 

यावेळी चेंबरचे मानद सचिव प्रशांत शिंदे, संचालक राहुल नष्टे, संपत पाटील, अभिजीत विचारे, धनाजी एकल, धैर्यशील जाधव , प्रथमेश सूर्यवंशी उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes