प्रशांत कोरटकरला अटक करण्याची मागणी; कोल्हापुरात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडी, शिवप्रेमींच्या कार्यकर्त्यांची धरपकड
schedule06 Mar 25 person by visibility 475 categoryराजकीय

कोल्हापूर :छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज, मराठा समाजाबद्दल अर्वाच्य भाषेत बोलणाऱ्या तसेच इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर याला अटक करावी या मागणीसाठी मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यावेळी खानविलकर पेट्रोल पंप येथे इंडिया आघाडीच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
कोरटकर यांच्या विरोधात जवाब दो आंदोलन करण्याचा इशारा शिवप्रेमी आणि इंडिया आघाडीच्या वतीने देण्यात आला होता . कोल्हापुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचा आज कोल्हापूर दौरा असून या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आला होता. त्यामुळेच कोल्हापुरातील पोलिसांनी सकाळपासूनच प्रमुख कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली होती.
कोरटकर यांच्या विरोधात कोल्हापूर व नागपूरमध्येही गुन्हा दाखल झाला आहे कोरटकर याला न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील शिवभक्त संघटना आणि इंडिया आघाडीच्या वतीने बैठक घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोरटकर याला अटक करूनच कोल्हापुरात यावे अन्यथा फडणवीस यांच्या दौऱ्यादरम्यान आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. आज मुख्यमंत्री यांच्या दौऱ्याच्या दरम्यान करण्यात येणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पहाटेपासूनच शिवभक्त संघटनांचे पदाधिकारी आणि इंडिया आघाडीच्या प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली पोलिसांनी पहाटे मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, शिवसेना ठाकरे गटाचे सह संपर्कप्रमुख विजय देवणे, उपनेते संजय पवार, हर्षल सुर्वे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष आर. के. पवार, चंद्रकांत यादव, जिल्हा काँग्रेस कमिटी सचिव संजय पवार, संजय पठारे मराठा महासंघाचे शशिकांत पाटील, अवधूत पाटील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे दिलदार मुजावर, प्राध्यापक सुभाष जाधव, प्रवीण पाटील, यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची धरपकड केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकार कोरटकर सारख्या प्रवृत्तीचा समर्थन करत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे सह संपर्कप्रमुख विजय देवणे यांनी केला आहे.
कार्यकर्त्यांना कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाणे आणि शाहूपुरी पोलिस ठाण्यात या कार्यकर्त्यांना आणण्यात आले होते.
मात्र गनिमी काव्यांने हे आंदोलन होणारच अशा प्रकारचा इशारा या कार्यकर्त्यांनी दिला होता. दरम्यान दुपारी खानोलकर पेट्रोल पंपा येथे कार्यकर्त्यांनी आंदोलन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निषेधार्थ घोषणा दिल्या तसेच यावेळी आंदोलकांनी पोलिसामार्फत हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात असून लोकशाही मार्गाने होत असलेल्या आंदोलनाला प्रशासन हाणून पाडत आहे असा आरोप केला . यावेळी पोलिसांनी या कार्यकर्त्यांची धरपकड करून आज्ञातस्थळी रवानगी केली.
▪️लोकशाही अधिकारांना पायदळी तुडवणाऱ्या मुस्कटदाबी सरकारचा जाहीर निषेध : वसंतराव मुळीक
मराठा समाजाच्या अस्मितेसाठी लढणाऱ्या अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपअध्यक्ष वसंतराव मुळीक यांना त्यांच्या राहत्या घरी जाऊन पोलिसांनी अटक केली. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री अशा दोन्ही पदांवरून समन्वयाची भूमिका घेत शिवरायांच्या विषयी आत्मियता दाखवण्या ऐवजी मराठ्यांचा कर्दनकाळ बनण्याचा केविलवाणा प्रयत्न करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचा आज पन्हाळा दौरा असल्याने कोल्हापूर पोलिसांनी वसंतराव मुळीक यांना अटक केले असून अभिव्यक्तीचा अधिकार कोल्हापूर पोलिसांनी पायदळी तुडवला आहे. पण मावळे गप्प बसणार नाहीत आणि पोलिसी अन्यायाला बळी न पडता देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा पन्हाळगडावर निषेध करतील. असे म्हटले आहे.