भारताचा पाकिस्तानवर विजय: कोहलीचे ५१ वे एकदिवसीय शतक
schedule23 Feb 25 person by visibility 309 categoryक्रीडा

नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६ विकेट्सने पराभव केला. यासह, संघाने २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात १८० धावांनी पराभवाचा बदला घेतला. रविवारी दुबईमध्ये पाकिस्तानने २४१ धावा केल्या. भारताने ४२.३ षटकांत ४ गडी गमावून लक्ष्य गाठले.
भारताकडून विराट कोहलीने नाबाद १००, श्रेयस अय्यरने ५६ आणि शुभमन गिलने ४६ धावा केल्या. कुलदीप यादवने ३ आणि हार्दिक पंड्याने २ विकेट घेतल्या. पाकिस्तानकडून सौद शकीलने ६२ आणि मोहम्मद रिझवानने ४६ धावा केल्या. शाहीन शाह आफ्रिदीने २ विकेट घेतल्या. अबरार अहमद आणि खुसदिल शाह यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
१५८ झेल घेऊन विराट एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक झेल घेणारा भारतीय खेळाडू ठरला.. विराट कोहलीने १११ चेंडूत १०० धावांची खेळी केली.