SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये इंडस्ट्रियल सेफ्टी बॅचचा उत्साहात निरोप समारंभकल्पनेपासून कृतीपर्यंत : केआयटीमध्ये उद्योजकतेचा प्रेरणादायी जागरजागतिक थायरॉईड दिन: आरोग्य आणि जागरूकतेचा संदेशशिवाजी विद्यापीठात उद्यापासून जागतिक पर्यावरण अभियानराज्यसभा पोटनिवडणुकीसाठी १८ जूनला मतदानउत्पादन आणि लॉजिस्टिक्सच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकेईएम रुग्णालयात अत्याधुनिक ‘व्हेसल सीलर’ उपकरणे उपलब्ध; गरीब रुग्णांना मोठा दिलासा'स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील म्हणजे तळागाळातील कार्यकर्त्यांचा आधारवड'चालुक्याज् क्रीडा महोत्सव २०२६: जिमनास्टिक्स व बास्केटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न; पुणे आणि साताऱ्याची बाजीकागलमध्ये राजमाता जिजाऊ बसचे स्वागत; मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बसचे पूजन

जाहिरात

 

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये इंडस्ट्रियल सेफ्टी बॅचचा उत्साहात निरोप समारंभ

schedule25 May 26 person by visibility 76 categoryशैक्षणिक

🟣 “सेफ्टी ऑफिसर म्हणजे अनेक कुटुंबांच्या सुरक्षिततेचा रक्षक” : विश्वस्त विनायक भोसले

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मान्यताप्राप्त ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी (शैक्षणिक वर्ष २०२५-२६) या अभ्यासक्रमाची चाळीस विद्यार्थ्यांची बॅच यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानिमित्त संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये  निरोप समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त  विनायक भोसले होते. इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अध्यक्षीय भाषणात विश्वस्त, विनायक भोसले यांनी इंडस्ट्रियल सेफ्टी ऑफिसरच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “सेफ्टी ऑफिसर हा केवळ उद्योगातील कर्मचारी नसून अनेक कुटुंबांच्या सुरक्षिततेचा रक्षक असतो. उद्योगातील प्रत्येक जीव मौल्यवान आहे आणि त्यांचे संरक्षण करणे हीच खरी राष्ट्रसेवा आहे.” त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळाली. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

संचालक डॉ. विराट गिरी यांनी विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील करिअरच्या संधी, शिस्त आणि जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना व्यावसायिक जीवनात सुरक्षितता संस्कृती जोपासण्याचे आवाहन केले.

डिपार्टमेंट ऑफ शॉर्ट कोर्सेसचे विभागप्रमुख प्रा. अजय कोंगे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात वर्षभरातील विविध उपक्रमांचा आढावा घेतला. त्यांनी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमाचे महत्त्व स्पष्ट करत “सुरक्षित उद्योग, समृद्ध राष्ट्र” हा संदेश सेफ्टी ऑफिसर यांना  दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विद्यार्थिनी समीक्षा जोशी यांनी  केले. कार्यक्रम आयोजनाची जबाबदारी ऋषिकेश केसरकर तसेच सर्व विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या सांभाळली.

 संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन  संजय घोडावत यांनी सेफ्टी ऑफिसर पदावर रुजू होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला शिक्षक, सर्व विद्यार्थी उपस्थिती होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes