SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
महिलांच्या ‘मार्केटिंग व विक्री कौशल्या’साठी विद्यापीठात सोमवारी एकदिवसीय कार्यशाळारेल्वे रिझर्वेशन सेंटरचे आमदार अमल महाडीक यांच्या हस्ते उद्घाटनजिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी पन्हाळा तालुक्यातील विविध पिकांची केली पाहणीमाजी दुग्धविकास मंत्र्यांचा दावा गंभीर, 'गोकुळ' वाचवण्यासाठी समविचारी आघाडीला साथ द्या: आमदार सतेज पाटील‘वंचित घटकांचे सिनेमातील स्थान’वर शिवाजी विद्यापीठात दोनदिवसीय कार्यशाळा ६ व ७ ऑक्टोबरला आयोजन; कार्यशाळा सर्वांसाठी खुलीस्व. शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त उमळवाड येथे आरोग्य शिबिर; ४५० नागरिकांची आरोग्य व नेत्र तपासणी‘महा-उपलब्धी’ ॲप कार्यशाळेला निवृत्तीवेतनधारकांनी उपस्थित राहावेप्रा. जगदीश सरदेसाई यांना मानसशास्त्र विषयातून पीएच. डी. इंडियन प्लंबिंग असोसिएशनच्या कोल्हापूर चॅप्टरतर्फे प्रथमच ‘आयपीपीएल’ स्पर्धेचे आयोजन; ३ ऑक्टोबरपासून रोटरी समाज केंद्रात विशेष प्रशिक्षणचेहऱ्यावरचे हसू अनमोल: जागतिक स्माइल दिन विशेष

जाहिरात

 

जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी पन्हाळा तालुक्यातील विविध पिकांची केली पाहणी

schedule03 Oct 26 person by visibility 214 categoryराज्य

कोल्हापूर : यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पिके करपली आहेत. ट्रिगर वन लागू केलेल्या तालुक्यांमधील पीक पंचनाम्याची कारवाई जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 यासाठी शासकीय सुट्ट्यांच्या दिवशीही पीक पंचनाम्याचे काम अखंडितपणे सुरू ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी यांनी पन्हाळा तालुक्यातील मौजे दानेवाडी , जाफळे, केखले, माले , शहापूर अशा विविध ठिकाणी भेट देऊन भात, सोयाबीन, भाजीपाला, ज्वारी, भुईमूग  आदी पिकांची पाहणी केली.

या भेटींमध्ये जिल्हाधिकारी डॉ . राठोड यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठाम आहे. नुकसान भरपाई देण्याकरिता पंचनामे जलद गतीने करणे सुरू आहेत. शेतकरी बांधवांनी आवश्यक कागदपत्रे देऊन सहकार्य करावे असे आवाहन केले. तसेच सर्व संबंधित शासकीय कर्मचारी, अधिकारी यांना लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. क्षेत्रीय अधिकारी यांना चारा उपलब्ध बाबत नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी त्यांच्या समवेत पन्हाळा प्रांताधिकारी डॉ. समीर शिंगटे, तालुका कृषी अधिकारी श्रीमती तापोळे यांच्यासह विविध कर्मचारी शेतकरी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes