प्रा. जगदीश सरदेसाई यांना मानसशास्त्र विषयातून पीएच. डी.
schedule03 Oct 26 person by visibility 125 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : श्रीपतराव चौगुले आर्ट्स अँड सायन्स कॉलेज माळवाडी कोतली येथील मानसशास्त्र विभाग प्रमुख प्रा. जगदीश आ. सरदेसाई यांना मानसशास्त्र विषयातून शिवाजी विद्यापीठाची पीएच. डी. पदवी प्राप्त झाली.
त्यांचा विषय 'सामाजिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांमधील संपादन प्रेरणा, भावनिक बुद्धिमत्ता, स्व-संकल्पना आणि शैक्षणिक संपादन यांच्यातील परस्परसंबंधाचा अभ्यास.'असा होता.
त्यांना डॉ. आर. के. अडसूळ व डॉ. भरत नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळ माळवाडीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. के. एस. चौगुले, सचिव शिवाजीराव पाटील, श्रीपतराव चौगुले आर्ट्स अँड सायन्स कॉलेज माळवाडी कोतोली चे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.