भाजपा महिला मोर्चाच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
schedule08 Mar 26 person by visibility 302 categoryसामाजिक
कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्यावतीने जागतिक महिला दिन भाजपा जिल्हा कार्यालयात उत्साहात संपन्न झाला. नूतन महापौर रुपाराणी निकम यांच्या हस्ते भारतमाता प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये महापौर रुपाराणी निकम तसेच महानगरपालिका निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व नगरसेविकांचा सत्कार करण्यात आला.
याप्रंगी बोलताना महापौर रूपाराणी निकम यांनी उपस्थित सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत स्त्री ही सृजनाची शक्ती, परिवर्तनाची ज्योत आणि भविष्याची आशा असल्याचे सांगत तिच्या स्वाभिमानातच समाजाचे उज्वल भविष्य सामावले असल्याचे नमूद करीत आपण सर्वांनी एकमेकींना सहाय्य करत नारीशक्तीच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील राहिले पाहिज्याचे नमूद केले.
यानंतर आहार व आरोग्य या विषयावर आहारतज्ञ डॉ. जीविता ताई यांनी मिलेट्सपासून (Millets) बनविल्या जाणाऱ्या पौष्टिक पदार्थांचा आहारामध्ये कसा उपयोग होतो व त्याचे आरोग्यासाठी असलेले महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. महिला सुरक्षितता या विषयावर ॲड. संगीता तांबे ताई यांनी ICC (Internal Complaints Committee) आणि POSH कायदा (Prevention of Sexual Harassment) याबाबत सविस्तर माहिती देत महिलांनी आपल्या हक्कांबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले.
उमाताई पवार यांनी योगा व प्राणायामाचे आरोग्यासाठी असलेले महत्त्व उपस्थित महिलांना सांगितले आणि नियमित योगाभ्यास करण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर स्वसंरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत मुलींनी कराटे व तायक्वोंडोचे प्रात्यक्षिक सादर करून महिला सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण केली.
यावेळी क्रीडाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मुली व महिलांचाही सत्कार करण्यात आला. महिला मोर्चाच्या अध्यक्षा माधुरी नकाते यांनी महिला दिन हा फक्त उत्सव नसून जागृतीचा दिवस असल्याचे सांगून महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्यरत राहणार असल्याचे नमूद केले
यांच्यासह महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस रिमा पालनकर, अश्विनी वासकर , अलका जावीर, वंदना बंबलवाड, अश्विनी गोपुडगे तेजस्विनी पार्टे,सीमा पालकर, शीतल तिरुखे, शिवानी पाटील, छाया ननवरे, शारदा पोटे, गीतांजली काटकर ,रूपाली आगळे तसेच इतर महिला मोर्चाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.