सैन्य दलामध्ये अधिकारी पदाच्या मोफत पूर्व प्रशिक्षणासाठी 8 जून रोजी मुलाखत
schedule20 May 26 person by visibility 133 categoryराज्य
कोल्हापूर : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) या परीक्षेची पूर्वतयारी करुन घेण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व युवतींसाठी 15 जून ते 28 ऑगस्ट या कालावधीत CDS कोर्स क्र. 67 छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाच्या मोफत प्रशिक्षणासाठी 8 जून पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे मुलाखतीस हजर रहावे.
या कोर्स कालावधील प्रशिक्षणार्थीना नि:शुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाणार आहे. मुलाखतीस येताना Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या संकेतस्थळावर सर्च करुन त्यामधील CDS -67 कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पुर्ण भरुन सोबत आणावयची आहे.
एस.एस.बी. वर्गामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी नमूद कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे. त्या संबंधीची पात्रता प्रशिक्षण प्रमाणपत्र वर्गाला येताना सोबत घेवून यावे. उमेदवार हा कोणत्याही शाखेचा उमेदवार असावा. लोकसंघ आयोग (UPSC) नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या सीडीएस या परिक्षेकरिता त्याने ऑनलाईन अर्ज केलेला असावा.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आयडी training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्र. 0253-2451032 किंवा व्हॉटसअॅप क्र. 9156073306 असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर मार्फत करण्यात आले आहे.