डीकेटीईच्या टेक्स्टाईल इंजिनिअरींग व डिप्लोमा विद्यार्थ्यांची शाही एक्सपोर्ट, शिमोगा येथे निवड
schedule20 May 26 person by visibility 74 categoryशैक्षणिक
इचलकरंजी : येथील डीकेटीईच्या टेक्स्टाईल इंजिनिअरींग व डिप्लोमा विभागामधील ६ विद्यार्थ्यांची देशातील अग्रगण्य गारमेंट उत्पादन उद्योगसमूह शाही एक्सपोर्ट, शिमोगा येथे आकर्षक पॅकेजवर निवड झाली आहे. टेक्स्टाईल क्षेत्रात उद्योगाभिमुख शिक्षण, आधुनिक तांत्रिक प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव यांचा प्रभावी संगम घडवून विद्यार्थ्यांना सक्षम अभियंता बनविण्यात डीकेटीई सातत्याने अग्रस्थानी राहिले आहे. त्यामुळेच शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांकडून रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असून, संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणपध्दतीवर उद्योगविश्वाने पुन्हा एकदा विश्वासाची मोहोर उमटवली आहे.
शाही एक्सपोर्टसच्या शिमोगा प्रकल्पामध्ये स्पिनिंग, निटींग व प्रोसेसिंग विभागासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त यंत्रसामग्री कार्यरत आहे. या प्रकल्पासाठी कुशल व तांत्रिकदृष्टया सक्षम अभियंते निवडण्यासाठी कंपनीच्या वरिष्ठ प्रतिनिधींनी डीकेटीईस भेट दिली रिटन टेस्ट व पर्सनल इंटरव्हयू व्दारे विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासली व त्यातून डिप्लोमा विभागातून प्रविण पाटील, पवन यादव डिग्रीमधून ओंकार माने, केदार यादव, प्रतिक्षा कुरुंदवाडे व ऋतूराज जाधव अशा एकूण ६ विद्यार्थ्यांची उत्तम पॅकेजवर निवड केली.
डीकेटीईमध्ये नियमित अभ्यासक्रमासोबत इंडस्ट्रियल ट्रेनिंग, सॉफट स्किल, स्किल डेव्हलपमेंट, उद्योगाभिमुख प्रात्यक्षिके, टेक्निकल वर्कशॉप, करिअर मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांचे प्रभावी आयोजन केले जाते. यामुळे येथील विद्यार्थी केवळ शैक्षणिक गुणवत्तेतच नव्हे तर औद्योगिक कार्यक्षमतामध्येही राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण करीत आहेत.
विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाणा आवाडे,माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सौ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे तसेच सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना इन्स्टिटयूटच्या संचालिका प्रा.डॉ.एल.एस.आडमुठे, उपसंचालक प्रा.डॉ.यु.जे. पाटील, टीपीओ प्रा. एस.बी.अकिवाटे, डिप्लोमाप्रमुख आर.के.वळसंग यांचे मार्गदर्शन लाभले.