SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
इंधन टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनकोल्हापूरला राज्याच्या टॉप १० शहरांत स्थान मिळवून देवू : आमदार राजेश क्षीरसागरविद्यापीठात ‘जीएसटी’च्या अनुषंगाने २३ मार्चपासून राष्ट्रीय चर्चासत्रचैतन्य बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळावर प्रशासक नियुक्तमहिला दिनाचे औचित्य साधत एचपीव्ही लसीकरण मोहीमेचा राज्यस्तरीय प्रारंभ बोगस उपचारांची पडताळणी करुन कारवाई करा : पोलीस उपधीक्षक तानाजी सावंतडीकेटीईच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय युवा उद्योजक परिषदेत विजेतेपदकृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही ग्रंथालयांचे महत्त्व अबाधित: डॉ. ज्योती जाधवसमाजकार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची कर्नाटक, तमिळनाडूतील सेवाभावी संस्थांना भेटस्वस्त आणि दर्जेदार उपचार: 'जन औषधी' ठरतेय सामान्यांचा आधार!

जाहिरात

 

बोगस उपचारांची पडताळणी करुन कारवाई करा : पोलीस उपधीक्षक तानाजी सावंत

schedule07 Mar 26 person by visibility 82 categoryराज्य

 कोल्हापूर : सार्वजनिक ठिकाणी दिल्या जाणाऱ्या बोगस उपचारांची पडताळणी करुन कारवाई करण्याच्या सूचना जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीचे सदस्य सचिव तथा पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय) तानाजी सावंत यांनी दिल्या.

 बोगस वैद्यकीय व्यवसायास आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याकरिता जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची बैठक पोलीस अधीक्षक कार्यालयात संपन्न झाली. यावेळी अन्न व औषध प्रसासन विभागाचे सहायक आयुक्त महेश कवटीकवार, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील डॉ. व्ही.ए. अरादेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातील डॉ. दीपक लाडे, सीपीआरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भूषण मिरजे, सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस आदी उपस्थित होते.   

 सार्वजनिक ठिकाणी, वर्तमानपत्रांत किंवा भिंतींवर दिल्या जाणाऱ्या बोगस उपचारांच्या जाहिरातींची पडताळणी करुन संबंधितांवर तातडीने कारवाई करावी. त्याचबरोबर रस्त्याच्या कडेला गाड्या लावून उपचाराचा दावा करणाऱ्या अमान्यता प्राप्त लोकांवरही कारवाई करण्यात येईल तसेच आवश्यक पदवी किंवा वैद्यकीय कौशल्य नसताना कोणी उपचार करत असेल तर पोलीस विभाग आणि अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत यासाठी पोलीस विभागाकडून तातडीने सहकार्य करण्यात येईल. अशी ग्वाही पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय) तानाजी सावंत दिली. तर कोल्हापूर जिल्ह्यातील अधिकृत डॉक्टर असणाऱ्या व्यक्तींची यादी जिल्हा परिषद, कोल्हापूरच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली असल्याची माहिती डॉ. दीपक लाडे यांनी दिली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes