SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
इंधन टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनकोल्हापूरला राज्याच्या टॉप १० शहरांत स्थान मिळवून देवू : आमदार राजेश क्षीरसागरविद्यापीठात ‘जीएसटी’च्या अनुषंगाने २३ मार्चपासून राष्ट्रीय चर्चासत्रचैतन्य बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळावर प्रशासक नियुक्तमहिला दिनाचे औचित्य साधत एचपीव्ही लसीकरण मोहीमेचा राज्यस्तरीय प्रारंभ बोगस उपचारांची पडताळणी करुन कारवाई करा : पोलीस उपधीक्षक तानाजी सावंतडीकेटीईच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय युवा उद्योजक परिषदेत विजेतेपदकृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही ग्रंथालयांचे महत्त्व अबाधित: डॉ. ज्योती जाधवसमाजकार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची कर्नाटक, तमिळनाडूतील सेवाभावी संस्थांना भेटस्वस्त आणि दर्जेदार उपचार: 'जन औषधी' ठरतेय सामान्यांचा आधार!

जाहिरात

 

महिला दिनाचे औचित्य साधत एचपीव्ही लसीकरण मोहीमेचा राज्यस्तरीय प्रारंभ

schedule07 Mar 26 person by visibility 115 categoryराज्य

कोल्हापूर  : राज्यातील १४ वर्षे वयोगटातील मुलींकरिता एचपीव्ही लसीकरण मोहीमेचा राष्ट्रीय शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २८ फेब्रुवारी रोजी करण्यात आला आहे. याअनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर व आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखालील ८ मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात येणार आहे.

एचपीव्ही लस १४ वर्षे पूर्ण झालेल्या व १५ वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींना देण्यात येणार आहे. तसेच मोहीम सुरू झाल्यानंतर पुढील ९० दिवसांच्या कालावधीत १५ वर्षे पूर्ण होणाऱ्या मुली देखील या लसीकरणस पात्र असतील. हे लसीकरण सर्व आरोग्य संस्थेमध्ये जसे की आयुष्यमान आरोग्य मंदिर, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांनी जवळच्या आरोग्य संस्थेमध्ये त्यांची नोंदणी करावी. तसेच यू विन (U-win) प्रणालीद्वारे ऑनलाईन नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

ही मोहीम शिक्षण विभाग, महिला व बालविकस विभाग, आदिवासी विकास विभाग, पंचायत राज संस्था तसेच वैद्यकीय व व्यावसायिक संघटना, स्वयंसेवी संस्था यांच्या सहभागातून राबविण्यात येणार आहे. एचपीव्ही लसीकरण मोहिमेचे नियोजन, समन्वय, देखरेख व तात्काळ समस्या निवारण करण्याकरीता जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. तसेच मोहिमेदरम्यान कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ व प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी रॅपिड रिस्पान्स टीमचीही स्थापना करण्यात आलेली आहे.

जास्तीत जास्त लाभार्थ्यानी या मोहिमेद्वारे लासीकरणाचा लाभ घ्यावा, तसेच एचपीव्ही लसीकरणच्या  अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन कोल्हापूर मंडळाचे आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes