SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पल्स २०२६ मुळे आरोग्य क्षेत्राला नवी दिशा; परिषदेत १५ सामंजस्य करार, ७२० कोटींची गुंतवणूक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस​"मुस्लिम ओबीसी आरक्षणाचे जनक हाजी शब्बीर अन्सारी यांना कोल्हापुरात भावपूर्ण श्रद्धांजली"उद्योग परवानग्यांमध्ये सुलभतेसोबत महाराष्ट्रात वीजदरातही टप्प्याटप्प्याने घट होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसइतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या विविध पुरस्कारांचे अर्ज सादर करण्यास मुदतवाढकोल्हापुरात ११ एप्रिलपासून 'भीम फेस्टिव्हल'चा जागर; डिगे फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रममुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचा सन्मान'डिजिटल महाराष्ट्र' संकल्पनेचे कोल्हापूर मॉडेल!बाजीराव पेशव्यांची दिल्लीवर धडक: जेव्हा मराठ्यांच्या घोड्यांनी यमुनेचे पाणी प्यायले!राजर्षी शाहूंच्या भूमीत अत्याचाराचा आकडा शून्यावर असायला हवा; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहनकडोलीत अवैध गुटख्यावर 'सर्जिकल स्ट्राईक'!

जाहिरात

 

पल्स २०२६ मुळे आरोग्य क्षेत्राला नवी दिशा; परिषदेत १५ सामंजस्य करार, ७२० कोटींची गुंतवणूक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

schedule28 Mar 26 person by visibility 113 categoryराज्य

मुंबई : ‘विकसित महाराष्ट्र 2047’ च्या दिशेने राज्याने आरोग्य क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे, पल्स 2026 परिषदेमुळे आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान व संशोधन आणि नवकल्पनांना चालना मिळाल्याची  माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

वैद्यकीय व औद्योगिक क्षेत्राला चालना देणाऱ्या ‘पल्स 2026’ परिषदेत जिओ वर्ल्ड सेंटर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या उपस्थितीत एकूण 15 सामंजस्य करारांवर (MoUs) स्वाक्षऱ्या करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

 या सामंजस्य करारावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अन्बळगन, वैद्यकीय शिक्षण व संशोधन आयुक्त अनिल भंडारी, पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दोन दिवस चाललेल्या या परिषदेत एकूण 15 सामंजस्य करार (MoUs) करण्यात आले. त्यापैकी 3 करारांद्वारे सुमारे 720 कोटी रुपयांची गुंतवणूक निश्चित करण्यात आली, तर 12 करार धोरणात्मक भागीदारीचे होते. परिषदेत 10हून अधिक देशांतील 130 पेक्षा जास्त तज्ज्ञ आणि 3000 हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला. ही केवळ परिषद आयोजित केली नाही, तर पुढील दशकात महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेची दिशा निश्चित करण्यात आल्याचे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यावेळी म्हणाले.

उद्योग विभागामार्फत करण्यात आलेल्या करारांमध्ये ‘बल्क ड्रग्ज पार्क’साठी सॅव्वी केअर आणि फार्मॅक्स या कंपन्यांकडून एकत्रित 520 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. तसेच निप्रो फार्मा पॅकेजिंग कंपनीने 200 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा करार केला आहे. यामुळे राज्यातील औषधनिर्माण क्षेत्र अधिक बळकट होणार आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाअंतर्गत करण्यात आलेल्या कराराअंतर्गत रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स अँड सर्जन्स ऑफ ग्लासगो आणि युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स यांच्यासोबत वैद्यकीय शिक्षण व प्रशिक्षणासाठी सहकार्य करार करण्यात आले. तसेच मँचेस्टर युनिव्हर्सिटी यांच्या सहकार्याने क्रीडा औषधनिर्माण क्षेत्रात उत्कृष्टता केंद्र उभारण्यात येणार आहे. कर्करोग व अत्याधुनिक उपचारांसाठी ‘4बेस केअर’ सोबत कॅन्सर इंटेलिजन्स प्रकल्प, तर मेड्ट्रॉनिक सोबत ‘स्ट्रोक सेंटर ऑफ एक्सलन्स’ उभारण्यासाठी करार करण्यात आले. यामुळे राज्यातील विशेष उपचार सुविधा अधिक सक्षम होणार आहेत.

पर्यटन व मानसिक आरोग्य क्षेत्रातही महत्त्वाचे करार झाले. सायप्रस चेम्बर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री सोबत मेडिकल टुरिझमला चालना देण्यासाठी सहकार्य करार करण्यात आले असून, ग्रॅव्हिटस फाउंडेशनच्या माध्यमातून बाल मानसिक आरोग्यासाठी विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

या परिषदेदरम्यान वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता, संशोधन, एआय-आधारित शिक्षण, रोबोटिक शस्त्रक्रिया तसेच उद्योग-अकॅडेमिया सहकार्य यावर सखोल चर्चा झाली. विविध आंतरराष्ट्रीय विद्यापीठे, आरोग्य संस्था आणि उद्योग क्षेत्रासोबत महत्त्वाचे करार करण्यात आले.

या करारानंतर मंत्री हसन मुश्रीफ आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes