SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कोल्हापूर येथे आगमन288 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान; पहा जिल्हानिहाय होणाऱ्या... ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी करवसुलीची अट शिथिलमॅट्रीकपूर्व व गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावेतकोल्हापूर जिल्ह्यात तीन सोयाबीन खरेदी नोंदणी केंद्रे सुरुकोल्हापुरातील ए व बी वॉर्डचा गुरुवारी पाणी पुरवठा बंदमेकॅनिकल कार पार्किंगचे काम अंतिम टप्प्यात; प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्याकडून मेकॅनिकल कार पार्किंगच्या कामाची पाहणीशिवाजी विद्यापीठाच्या १५४ विद्यार्थिनींची ‘इन्फोसिस’मध्ये निवड; केवळ विद्यार्थिनींसाठी विद्यापीठातील दुसरा सर्वात मोठा कॅम्पस ड्राईव्हक्रिकेट विश्वचषकावर भारताचे नाव कोरणाऱ्या भारतीय महिला संघाचे मंत्रिमंडळ बैठकीत अभिनंदनडी वाय पाटील हॉस्पिटल संघांचा हॉस्पिटल प्रीमियर लीगमध्ये विजयी चौकार

जाहिरात

 

नवीन शैक्षणिक धोरण आत्मसात करून वर्गाध्यापन सक्षम करणे ही शिक्षकाची जबाबदारी : प्राचार्य सुस्मिता मोहत्तीं

schedule10 Jun 24 person by visibility 473 categoryशैक्षणिक

वारणा नगर : शिक्षकांनी नवीन शैक्षणिक धोरण आत्मसात करणे गरजेचे आहे, शाळांमधून विध्यार्थ्यांना जगात वावरण्याचं ज्ञान देण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. आणि ती शिक्षकाने सक्षम वर्गाध्यापन करून सामर्थ्य ने पार पाडली पाहिजे असे मत प्राचार्य सुस्मिता मोहत्तीं यांनी वारणा नगर येथे बोलताना व्यक्त केले.

तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमी मध्ये शिक्षक क्षमता विकास कार्यशाळा शिबिराचे उदघाटन प्रसंगी श्रीमती मोहत्तीं बोलत होत्या, कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही व्ही करजनी हे होते.

 यावेळी बोलताना डॉ. करजींनी बोलताना म्हणाले आज शिक्षकांनी बदलत्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतः ला तयार केले पाहिजे शिक्षक म्हणून येणाऱ्या काळातील शैक्षणिक बदल शिक्षकांनी आत्मसात केले पाहिजेत या उद्देशाने या क्षमता विकास कार्यशाळेचे आयोजन केले आहे. कार्यक्रमात स्वागत मिलिटरी अकॅडमी चे प्राचार्य टी बी रहाटवळ यांनी केले तर प्रास्ताविक शिबीर संयोजक प्राचार्य एम.टी.कलाधारण यांनी केले.

या कार्यशाळेत पहिल्या सत्रात आनंदी शिक्षण या विषयावर वारणा विद्यापीठाच्या परीक्षा विभाग संचालक डॉ. प्रा. शोभा कुंबार यांचे शिक्षकांना मार्गदर्शन झाले. दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांचा भावनिक व सामाजिक विकास या विषयावर नवोदय विद्यालय लखनऊ चे सेवा निवृत्त सहायक आयुक्त डॉ.देवेंद्रसिंग यादव यांनी मार्गदर्शन केले.तर प्रभावी शिक्षणासाठी तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर व्याख्यान दिले.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ.पी आर पगारेपाटील, व आर एम मस्कर यांनी केले आभार प्रशांत जाधव यांनी मानले .

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes