SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी 15 जुलैपर्यंत अर्ज करावेतकोल्हापूरसह चार जिल्ह्यांत धुमाकूळ घालणाऱ्या सराईत चेन स्नॅचर टोळीचा पर्दाफाश; दोन आरोपी गजाआडपिरवाडी येथे हातभट्टी दारूविरुद्ध संयुक्त कारवाईजयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्र देशात आदर्श ठरणार : आ. राजेंद्र पाटील-यड्रावकरजागतिक वर्षावन दिन: पृथ्वीच्या फुफ्फुसांचे संरक्षण काळाची गरज बारावा आंतरराष्ट्रीय योगदिन शिवाजी विद्यापीठात उत्साहात साजरा, योग साधना ही जीवन पध्दती बनवण्याची गरज : खासदार धनंजय महाडिकऑलिंपिकपटू बंडा पाटील यांना 'खाशाबा जाधव' पुरस्कार जाहीरआंतरराष्ट्रीय योग दिवस: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचा भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांसमवेत योगाभ्यासआजारांना दूर ठेवण्यासाठी योग हा रामबाण उपाय : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसशाहू महाराजांच्या विचारांचा वारसा यड्रावकर बंधू चालवत आहेत : उद्योग मंत्री उदय सामंत

जाहिरात

 

पिरवाडी येथे हातभट्टी दारूविरुद्ध संयुक्त कारवाई

schedule22 Jun 26 person by visibility 114 categoryगुन्हे

कोल्हापूर : राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे यांच्या निर्देशानुसार रविवारी निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र.2, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, करवीर पोलीस ठाण्याचे अंमलदार ,अन्न औषध प्रशासनचे अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या समवेत पिरवाडी येथे हातभट्टी दारू विक्री करणारी बेबी रवी मछले ही संशयित महिला विनापरवाना अवैधपणे देशी व विदेशी दारू विक्री करताना मिळून आल्याने या महिलेविरुद्ध महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियम 1949 चे कलम 65 (ई) अन्वये गुन्हे नोंद करण्यात आला. 

पिरवाडी गावातील बेबी रवी मछले या महिलेवर सन 2025 पासून ते आज अखेर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एकूण 11 गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. 

गावठी हातभट्टी दारूचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्व ग्रामपंचायातींनी ग्रामरक्षक दलाची स्थापना करावी तसेच अवैध गावठी हातभट्टी दारूची विक्री, निर्मिती किंवा वाहतूक याची माहिती मिळाल्यास या विभागाच्या टोल फ्री क्र.18002339999 या क्रमांकावर किंवा whatsapp क्र. 8422001133 या क्रमांकावर संपर्क साधावा.

या कारवाईवेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक युवराज शिंदे, राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक पी.आर. खरात, उप निरिक्षक  के.एस. पाटील, यु.जी. कांबळे, ए.टी.घोसाळकर, एस.डी. राजगुरू, पांडुरंग घुगे तसेच अन्न सुरक्षा अधिकारी श्रद्धा साळुंके,  पोलीस अंमलदार प्रकाश कांबळे, अमोल चव्हाण ,  राज्य उत्पादन शुल्काचे, जवान सर्वश्री देवेंद्र पाटील, संदीप हालुंडे, संदेश कोळी, आशिष पोवार, सुशांत पाटील, आदर्श धुमाळ पिरवाडीच्या सरपंच अनिता खोत , पोलीस पाटील राजश्री जाधव आदी उपस्थित होते .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes