+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustग्रंथ जगण्याची प्रेरणा देतात : समीर देशपांडे; करवीर नगर वाचन मंदिरात वाचन प्रेरणा दिन adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त
schedule21 Feb 24 person by visibility 297 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : वनरक्षक भरती प्रक्रीया सन 2023 ने अनुषंगाने विविध जिल्हयातून भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांची दि.22 ते 29 फेब्रुवारी 2024 अखेर धाव चाचणीसाठी राज्यभरातून उमेदवार कोल्हापूर येथे येणार आहेत. या उमेदवारांची धाव चाचणी कागल रोडवरील लक्ष्मी टेकडी ते रेमंड चौक या एकेरी मार्गावर होणार आहे,

 या उमेदवारांना कोल्हापूर स्टँड येथून लक्ष्मी टेकडी या ठिकाणी पहाटे 5.00 ते सायंकाळपर्यंत जाणे-येणेसाठी परिवहन उपक्रमाची बससेवा उपलब्ध ठेवणेत आली आहे. या मार्गावर कळंबा ते राजारामपुरी मार्गे कागल, साळोखेनगर-आपटेनगर ते राजारामपुरी मार्गे कागल तसेच बोंद्रेनगर ते तावडे हॉटेलमार्गे कागल या नियमीत बसेस बरोबरच उमेदवारांच्या उपस्थितीनुसार जादा बसेस सोडणेत येणार आहेत.  

तरी, या भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांनी या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन उपक्रमातर्फे करणेत येत आहे.