SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरीता नोंदणी आणि आवेदनपत्रासाठी १३ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढजिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्याचे उद्दिष्ट; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे प्रशासनाला निर्देशआंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिंपियाडमध्ये संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान एस.ए.ई. ई-बाहा स्पर्धेमध्ये ‘केआयटी’चा डंका; राष्ट्रीय स्तरावर केआयटीच्या विद्यार्थ्यांनी सिद्ध केली आपली तांत्रिक क्षमतामानवी जीवनात तंत्रज्ञानापेक्षा संवेदना महत्त्वाच्या: गजानन राजमानेडॉ. राजेश ख्यालप्पा यांना एफआयसीपी फेलोशिपशिवाजी विद्यापीठात अर्थसंकल्पावर विशेष परिसंवादनिवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी मुंबई येथे 58 वी पेन्शन अदालतमराठा दिननिमित्त ‘पर्वत ते सागर’ सायकल मोहिमेचे बुधवारी आयोजनव्यवसाय वृध्दी व उत्पादनाची पोर्टलवर होणार जाहिरात

जाहिरात

 

एस.ए.ई. ई-बाहा स्पर्धेमध्ये ‘केआयटी’चा डंका; राष्ट्रीय स्तरावर केआयटीच्या विद्यार्थ्यांनी सिद्ध केली आपली तांत्रिक क्षमता

schedule03 Feb 26 person by visibility 169 categoryशैक्षणिक

 कोल्हापूर  : सोसायटी फॉर ऑटोमोटिव्ह इंजिनीअर्स (SAE ) च्या वतीने ‘नॅशनल ऑटोमोटिव्ह टेस्ट ट्रॅक्स’ पिथंपुर,मध्य प्रदेश येथे राष्ट्रीय स्तरावरील एस.ए.ई - ई-बाहा स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. 

या स्पर्धेमध्ये केआयटी ला एकूण ३ गटात यश मिळाले.

१. स्लेज पूल - राष्ट्रीय स्तरावरील ३ क्रमांक

२. मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स- राष्ट्रीय स्तरावरील ९ क्रमांक

३. एक्सेलरेशन - राष्ट्रीय स्तरावरील १२ क्रमांक

या राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठित स्पर्धेत देशभरातून अग्रमानांकित आय.आय.टी, एन.आय.टी.शासकीय,खाजगी अभियांत्रिकी कॉलेजेस, खाजगी विद्यापीठे अशा देशभरातील जवळपास ९४ महाविद्यालयांचा सहभाग या स्पर्धेमध्ये होता. मुख्यत्वे करून या स्पर्धेमध्ये विद्यार्थी इलेक्ट्रिक ऑफ रोड वाहनाचे वाहनाचे डिझाईन, उत्पादन, चाचणी, सुरक्षितता, टीम बिल्डिंग, प्रकल्प व्यवस्थापन आणि खर्चाचे नियोजन अशी कौशल्ये विकसित करण्यावरती या स्पर्धेमध्ये भर देण्यात येतो.विद्यार्थी या स्पर्धेत डिझाईन मॅन्युफॅक्चरिंग व प्रत्यक्ष टेस्टिंग करतात.एखाद्या व्यवसायिक ऑटोमोबाईल कंपनी प्रमाणे विद्यार्थी प्रत्यक्ष करून हा तांत्रिक अनुभव घेतात. 

विद्यार्थ्यांच्या तांत्रिक क्षमतांचा विकास करणारी व त्यांच्या प्रश्न सोडवण्याच्या क्षमतांना आव्हान देणारी ही स्पर्धा होती असे मनोगत केआयटी चे या स्पर्धेचे मुख्य मार्गदर्शक डॉ. आसिफ कुरेशी यांनी व्यक्त केले.या स्पर्धेमध्ये सहभागी होताना केआयटीने विद्यार्थ्यांना रु. १५ लाखाचे सहकार्य केले.

 तसेच परिसरातील विविध उद्योजकांनी सुद्धा या स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना बहुमोल तांत्रिक मार्गदर्शन,सहकार्य व आर्थिक योगदान केले अशा भावना केआयटीच्या टीमचा प्रमुख गौरव भिऊंगडे यांनी व्यक्त केल्या.जवळपास आम्ही गेले एक वर्षापासून या स्पर्धेची तयारी करत आहोत या स्पर्धेच्या निमित्ताने आम्हाला सर्व मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस स्वतः करता आल्या, आमचे स्वतःचे कौशल्य यामुळे विकसित झाले आहे. तसेच आधुनिक ई-बाईक च्या विषयातील आमच्या कल्पनांचे योगदान आम्हाला या स्पर्धेच्या निमित्ताने सादर करता आले असा आत्मविश्वासपूर्वक अनुभव सह-प्रमुख साद अत्तार याने व्यक्त केला.

केआयटी आपल्या विद्यार्थ्यांना सातत्याने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धेच्या निमित्याने जाण्यासाठी सतत प्रोत्साहित करत असते नुसतेच प्रोत्साहित नाही तर त्यासाठी लागणारे आर्थिक सहकार्य सुद्धा त्यांना देत असते.ज्यामुळेच केआयटीचा अशा स्पर्धांमध्ये यशाचा आलेख सातत्याने उंचावत आहे अशा भावना केआयटी चे संचालक डॉ मोहन वनरोट्टी यांनी व्यक्त केल्या.

या सर्व टीम मध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील  जवळपास २५ विद्यार्थी विद्यार्थिनींचा सहभाग हा अत्यंत मोलाचा ठरला. मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख डॉ उदय भापकर, संस्थेचे अध्यक्ष श्री साजिद हुदली, उपाध्यक्ष श्री सचिन मेनन ,सचिव दीपक चौगुले अन्य विश्वस्त यांचे मोलाचे प्रोत्साहन व मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना मिळाले.प्रत्यक्ष स्पर्धेच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व प्रोत्साहित करण्यासाठी प्रा.शाम अडेपल्ली यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes