निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी मुंबई येथे 58 वी पेन्शन अदालत
schedule03 Feb 26 person by visibility 123 categoryराज्य
कोल्हापूर : मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबईव्दारे टपाल विभागाच्या निवृत्ती वेतनधारकांसाठी, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी 58 वी पेन्शन अदालत दिनांक 17 मार्च रोजी 11.30 वाजता मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई - 400 001 येथे आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती कोल्हापूर विभागाचे प्रवर डाक अधीक्षकांनी दिली आहे.
निवृत्ती वेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत, ज्यांचा सेवेत असताना मृत्यु झाला आहे. टपाल विभाग, महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे निवृत्तीवेतनधारक ज्यांची 3 महिन्यांच्या आत पूर्तता झालेली नाही अशा प्रकरणांचा डाक पेन्शन अदालतमध्ये विचार केला जाईल.
पेन्शनधारकांनी आपली तक्रार वैयक्तिकरित्या विहीत नमुन्यात तीन प्रतीमध्ये वरिष्ठ लेखा अधिकारी, सचिव, पेन्शन अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, मुंबई जी.पी. ओ. इमारत, पहिला मजला, मुंबई - 400 001 येथे किंवा aeets.mh@indiapost.gov.in या ई मेल वर 16 फेब्रुवारी रोजी किंवा त्यापूर्वी सादर करावी. 16 फेब्रुवारीनंतर मिळालेल्या अर्जांवर पेन्शन अदालतमध्ये विचार केला जाणार नाही.