SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
लहान मासे पकडून खरेदी विक्री केल्यास दंडात्मक कारवाईजलजीवन मिशन कोल्हापूर जिल्हयात शंभर टक्के यशस्वी होण्यासाठी उर्वरीत ६७ गावांना निधी द्यावा, खासदार धनंजय महाडिक यांचं केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांना निवेदन"चंद्रकांत चषक -२०२५" फुटबॉल स्पर्धेस उत्साहात प्रारंभभाजपा संघटन पर्व अभियानांतर्गत आढावा बैठक उत्साहात संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागात आजी- माजी विद्यार्थी व पालक मेळावाजनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरुन संघर्ष करण्याची तयारी ठेवा; काँग्रेसचे कोल्हापूर निरीक्षक संजय बालगुडे यांचे कार्यकर्त्यांना आवाहनविद्यापीठाच्या क्रिकेट मैदानासाठी पंजाब नॅशनल बँकेकडून एक लाखाचा निधीडीकेटीईच्या मुलांचा खो खो संघ राष्ट्रीय स्तरावरील सीओईपी, पुणे येथील स्पर्धेत विजयीक.वाळवेच्या शितल भांदिगरे यांची म्‍हैस तर माणकापूरचे प्रफुल्ल माळी यांची गाय प्रथम कोल्हापूर विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी समीर देशपांडे

जाहिरात

 

के.एम.टी. उपक्रमाचा सन 2025-2026 चा नवीन अंदाजपत्रकीय आराखडा सादर

schedule26 Mar 25 person by visibility 273 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर  : के.एम.टी. उपक्रमाचा सन 2024-2025 चा सुधारीत व सन 2025-2026 चा जमा खर्चाचा महसूली रु.47,68,000/- शिल्लकीचा नवीन अंदाजपत्रकीय आराखडा मा.उप समितीमार्फत प्रशाकसक यांचे मान्यतेस्तव सादर करणेत आला.  नवीन अंदाजपत्रकीय आराखड्यामध्ये अव्वल शिल्लकेसह महसूली जमा रु.75,66,83,000/- आणि महसूली खर्च रु.75,19,15,000/- असा रु.47,68,000/- चा शिल्लकी अंदाज, तर अव्वल शिल्लकेसह भांडवली जमा रु.34,00,60,000/- व भांडवली खर्च रु.33,55,10,000/- असा आहे.  नवीन अंदाजपत्रकीय आराखड्यामध्ये महापालिकेकडून महसुली खर्चासाठी अर्थसहाय्य रु.22.00 कोटी व PM e-Bus Sewa योजनेंतर्गत इलेक्ट्रिक बसेससाठी केंद्र शासनाकडून महसुली अनुदान म्हणून रु.532.00 लाख निधीची तरतूद करण्यात आली आहे.  

तसेच, इलेक्ट्रिक बसेस सुरु करणेत येणार असलेने विजेवरील खर्चामध्ये बचत करणेच्या उद्देशाने DPDC अथवा मेडा अनुदानातून सौर ऊर्जा प्रकल्पासाठी रु.500.00 लाख  तरतूद  भांडवली अंदाजपत्रकी  करणेत आली आहे.  तसेच, Behind the Meter Power Infrastructure व डेपो डेव्हलपमेंटसाठी केंद्र व राज्य शासन अनुदानातून रु.1650.00 लाख तरतूद करण्यात आली आहे.  केंद्र व राज्य शासन तसेच मनपा हिस्सा अशा एकत्रित अनुदानातून रु.500.00 लाख तरतूद ITS साठी करणेत आली आहे.  

त्याचप्रमाणे महिला व बाल कल्याण विभागाच्या अनुदानातून शहरातील प्रमुख मार्गावर शटल इलेक्ट्रिक रिक्षा करितां रु.20.00 लाख तरतूद करणेत आली असून, सदरच्या रिक्षा फक्त महिला, ट्रान्स्जेंडर (तृतीयपंथी व्यक्ती) व HIV बाधित या विशेष घटकांमार्फत सामाजिक बांधीलकी म्हणून महानगरपालिकेच्या अधिपत्त्याखाली सुरु करणेत येणार आहेत.

सन 2024-2025 चे नवीन अंदाजपत्रकामध्ये के.एम.टी. बस ताफ्यातील 68 डिझेल इंधनाच्या व PM e-Bus Sewa प्रकल्पातील 100 इलेक्ट्रिक बसेस पुढील आर्थिक वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने दाखल होऊन पुढील वर्षभरात एकूण 96 बसेस मार्गस्थ राहतील, असे नियोजन करणेत आले आहे.  सदर बसेस पासून प्रवासी तिकीट विक्रीतून मिळालेले उत्पन्न व पे ॲण्ड पार्किंग, बसवरील जाहिरात इत्यादी मार्गाने येणारे उत्पन्न महसूली जमेस धरणेत आले आहे.

पुढील नवीन आर्थिक वर्षामध्ये 100 इलेक्ट्रिक बसेसच्या अनुषंगाने पायाभूत सुविधांमधील भुमिगत 10 कि.मी. अंतराची 33 KV क्षमतेची HT Line पूर्ण करणे व मिटर रुमसहीत LT Line चे काम करुन बस ऑपरेटर यांचेकडून पूर्ण क्षमतेने चार्जिंग स्टेशन उभे करण्याचे उद्दिष्ट आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या अनुदानातून नवीन अत्याधुनिक डेपो विकसीत करणेत येत असून, यामध्ये चार्जिंग स्टेशन, प्रशासकीय इमारत, वर्कशॉप, कर्मचाऱ्यांसाठी रेस्ट रुम व कॅण्टीन सुविधा, पूर्ण डेपोचे काँक्रीटीकरण, ETP (Effluent Treatment Plant) व STP (Sewage Treatment Plant), संपूर्ण डेपोचे यार्ड लायटींग, वॉशिंग रॅम्प, स्टोअर रुम, उपलब्ध होणाऱ्या जागेमध्ये हिरवळ व वृक्षारोपण इ. सोई-सुविधा निर्माण करणेत येणार आहेत.  सदरचा नवीन डेपो 5 एकर जागेमध्ये विकसीत होणार असून, त्यासाठी सुमारे रु.1600.00 लाख खर्च अपेक्षित आहे.

100 इलेक्ट्रिक बसेस दाखल होताना, यामध्ये प्रामुख्याने एस.टी. स्टॅण्ड ते श्री अंबाबाई मंदिर मार्गावर शटल सर्व्हीस, विद्यार्थी व महिला प्रवाशांसाठी विशेष बसेस, पन्हाळा, जोतिबा व धार्मिक स्थळे तसेच कोल्हापूर विमानतळ येथून शहरामध्ये येणेसाठी विशेष बस सेवा सुरु करणेत येणार आहे.  यामुळे कांही मार्गांचे विस्तारीकरण व नवीन मार्ग रचना अंमलात येणार आहे.

इलेक्ट्रिक बसेसमुळे वाढणाऱ्या विजेवरील खर्चामध्ये बचत करणेच्या उद्देशाने के.एम.टी. उपक्रमाच्या आरक्षित जागांवर किमान 1 MW क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणेचे उद्दिष्ट असून, त्यासाठी DPDC अथवा MEDA यांचेकडून रु.500.00 लाख अनुदान प्राप्त होणेसाठी प्रस्तावीत आहे.

केंद्र शासनाच्या योजनेतून सार्वजनिक परिवहन उपक्रमांकडील ITS यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी निधी उपलब्धतेनुसार ITS यंत्रणा विकसीत करुन, त्यामधून ॲण्ड्रॉईड बेस्ड ई-तिकीटींग डिव्हाईस, संगणकीकृत पास वितरण यंत्रणा, मोबाईल ॲपद्वारे तिकीट विक्री, डिजीटल पेमेंट, PIS, MIS, जीपीएस, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, VTS, कमांड कंट्रोल सेंटर कार्यान्वित करणेत येणार आहे.  त्यासाठी रु.500.00 लाख तरतूद करण्यात आली आहे.

के.एम.टी. / मनपाच्या आरक्षित जागांवर के.एम.सी. वाहने तसेच खाजगी वाहनांसाठी व्यापारी तत्वावर सीएनजी/डिझेल/पेट्रोल पंप सुरु करणेचे उद्दिष्ट आहे.  

कोल्हापूर महानगरपालिकेची हद्दवाढ अपेक्षित धरुन आरटीओ नियमांतर्गत इंटरसिटी शहरी बस वाहतूक नियोजित असून, त्यासाठी केंद्र शासनाच्या PM e-Bus Sewa प्रकल्पांतर्गत आणखी जादा 50 इलेक्ट्रिक बसेसची मागणी करणेत येणार आहे.

सध्याच्या पे ॲण्ड पार्किंगचे ठिकाणी टॉयलेट, पार्किंग पट्टे, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह दिशादर्शक फलक, खाजगी वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन, पे ॲण्ड पार्किंग मोबाईल ॲप इ. सुविधा स्वनिधीतून करणेचे नियोजन आहे.

शहर सौंदर्यीकरणाच्या दृष्टीने ऐतिहासिक ठिकाणी हेरिटेज पध्दतीचा मॉडेल बस थांबा स्वनिधीतून विकसीत करणेत येणार आहे.

श्री नवदुर्गा दर्शन बस सेवा नवीन ए.सी. इलेक्ट्रिक बसेसद्वारे देणेत येणार असून, यामधून प्रवास करणाऱ्या महिला व भाविकांना पिण्याचे पाणी बॉटल, स्नॅक्स व चहा-कॉफीची सोय उपलब्ध करुन देणेत येणार आहे.

वरीलप्रमाणे कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाचे सन 2025-26 या आर्थिक वर्षाचे नवीन अंदाजपत्रकामध्ये प्रमुख बाबींचा समावेश करुन दैनंदिन वाहतूक संचलन सुरळीत ठेवणेसाठी नवीन अंदाजपत्रक “ब” सादर केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes