के.एम.टी.चा 63 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
schedule01 Apr 25 person by visibility 202 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : के.एम.टी. उपक्रमाचा 63 वा वर्धापन दिन आज उत्साहात साजरा झाला. वर्धापनदिनानिमित्त के.एम.टी.च्या शास्त्रीनगर येथील यंत्रशाळेमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक व परिवहन व्यवस्थापक के.मंजूलक्ष्मी यांचे हस्ते ध्वजवंदन करणेत आले.
यावेळी यंत्रशाळा परिसरामध्ये उभारणेत आलेल्या के.एम.टी. उपक्रमाचे संस्थापक कै. श्रीपतराव बोंद्रे (दादा) यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रशासक, के. मंजूलक्ष्मी यांनी के.एम.टी. कर्मचाऱ्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सध्या के.एम.टी. उपक्रमाकडे 66 बसेसद्वारे दैनंदिन वाहतूक संचलन सुरु आहे. लवकरच उपक्रमाच्या ताफ्यामध्ये पीएम ई-बस सेवा योजनेतून नवीन 100 इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहेत. या सर्व बसेसद्वारे नागरिकांना जास्तीत जास्त प्रवासी वाहतुकीची सेवा पुरविणेसाठी प्रयत्नयशील रहाण्याचे आवाहन प्रशासक यांनी केले. के.एम.टी. अंदाजपत्रकाध्ये येणारी तूट भरुन काढण्यासाठी जास्तीत जास्त उत्पन्न प्राप्त होणेसाठी सर्वांनी सामुदायिक प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी यंत्रशाळा परिसरामध्ये सुरु असलेल्या पीएम ई-बस सेवा योजनेंतर्गत एचटी व एलटी लाईन तसेच स्थापत्य विषयक कामकांजाचा आढावा त्यांनी घेतला.
यावेळी सहा.आयुक्त तथा अति.परिवहन व्यवस्थापक संजय सरनाईक, वर्क्स मॅनेजर दिपक पाटील, लेखापाल राजेंद्र सुर्यवंशी, अंतर्गत लेखा परीक्षक दिनेश सोमण, जनसंपर्क अधिकारी संजय इनामदार, खरेदी व भांडार अधिकारी संजय जाधव, प्रकल्प अधिकारी पी.एन.गुरव, सहा.अभियंता सुरेश पाटील, कसुरी विभाग प्रमुख प्रदिप म्हेतर, आस्थापना अधिक्षक वानू साबळे, वाहतूक निरिक्षक सुनिल जाधव, इश्यु– कॅश अधिक्षक नितीन पोवार, मेकॅ.सुपरवायझर शंकर जाधव, रणधीर मोरे, विक्रम गवळे, दत्ता साळोखे, मृणाल गायकवाड तसेच के.एम.टी. सर्व विभागांकडील अधिकारी व कर्मचारी तसेच सुसंस्कार हायस्कूल, माझी शाळाचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
यानंतर के.एम.टी. उपक्रमाच्या शाहू क्लॉथ मार्केट येथील प्रधान कार्यालयात ज्येष्ठ वाहतूक निरिक्षक सुनिल जाधव यांचे हस्ते कै.श्रीपतराव बोंद्रे (दादा) यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करणेत आले.