SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
के.एम.टी.चा 64 वा वर्धापन दिन उत्साहात साजराकोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई; १.७९ कोटींचा मुद्देमाल जप्त, गोव्याहून येणारा दारूचा ट्रक पकडलाकोल्हापुरात स्वामी अभेदानंदजींची व्याख्यानमाला; 'गीतेतील भक्ती, शक्ती आणि मुक्ती' विषयावर होणार प्रबोधनएप्रिल फूल डे: हास्याचा उत्सवअश्विनी भिडे मुंबई महानगरपालिकेच्या नव्या आयुक्त; बीएमसीला मिळाल्या पहिल्या महिला आयुक्तमराठी भाषेसाठी राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदानकृषी विभागामार्फत विविध पुरस्कार आता ऑनलाईन पध्दतीने स्विकारणार : कृषि मंत्री दत्तात्रय भरणेसंयुक्त संगमनगर तारदाळ श्रीराम चौक येथे श्रीराम नवमी उत्सव उत्साहात महिला व बालकांच्या पोषणात लक्षणीय सुधारणेचे उदिष्ट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

जाहिरात

 

के.एम.टी.चा 64 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

schedule01 Apr 26 person by visibility 141 category

कोल्हापूर  : के.एम.टी. उपक्रमाचा 64 वा वर्धापन दिन आज उत्साहात साजरा झाला.  वर्धापनदिनानिमित्त के.एम.टी.च्या शास्त्रीनगर येथील यंत्रशाळेमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर रुपाराणी निकम यांचे हस्ते ध्वजवंदन करणेत आले.  यावेळी यंत्रशाळा परिसरामध्ये उभारणेत आलेल्या के.एम.टी. उपक्रमाचे संस्थापक कै.श्रीपतराव बोंद्रे (दादा) यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास महापौर रुपाराणी निकम यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. 

 यावेळी महापौर रुपाराणी निकम, परिवहन समितीचे सभापती सत्यजित जाधव आणि  आयुक्त आणि परिवहन व्यवस्थापक के.मंजूलक्ष्मी यांनी के.एम.टी. कर्मचाऱ्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.  

यावेळी स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बाल कल्याण समिती सभापती कौसर बागवान, उप सभापती दिपा ठाणेकर, परिवहन समिती सदस्य मानसी लोळगे, उमेश पोवार, महेंद्र कोरडे, प्रसाद जाधव, हेमंत आराध्ये, रोहन अतिग्रे, श्रीधर गाडगीळ, अक्षय शेळके, नगरसेवक स्वरुप कदम, माधुरी व्हटकर, पूजा पोवार, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, मुख्य लेखापाल, को.म.न.पा. तथा अति.परिवहन व्यवस्थापक संजय सरनाईक, वर्क्स मॅनेजर रणधीर मोरे, लेखापाल राजेंद्र सुर्यवंशी, कामगार व जनसंपर्क अधिकारी संजय इनामदार, अंतर्गत लेखापरिक्षक दिनेश सोमण, खरेदी व भांडार अधिकारी संजय जाधव, प्रकल्प अधिकारी पी.एन.गुरव, सहा.अभियंता सुरेश पाटील, कसुरी विभाग प्रमुख प्रदिप म्हेतर, आस्थापना अधिक्षक सौ.वानू साबळे, वाहतूक निरिक्षक नितीन पोवार, सागर वंजारे, विवेक साठे, मारुती पाटील, हेमंत हेडाऊ, माजी वाहतूक निरिक्षक सुनिल जाधव तसेच के.एम.टी. सर्व विभागांकडील अधिकारी व कर्मचारी तसेच सुसंस्कार हायस्कूल कदमवाडीचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

यानंतर के.एम.टी. उपक्रमाच्या शाहू क्लॉथ मार्केट येथील प्रधान कार्यालयातील कै.श्रीपतराव बोंद्रे (दादा) यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करणेत आले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes