SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अश्विनी भिडे मुंबई महानगरपालिकेच्या नव्या आयुक्त; बीएमसीला मिळाल्या पहिल्या महिला आयुक्तमराठी भाषेसाठी राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदानकृषी विभागामार्फत विविध पुरस्कार आता ऑनलाईन पध्दतीने स्विकारणार : कृषि मंत्री दत्तात्रय भरणेसंयुक्त संगमनगर तारदाळ श्रीराम चौक येथे श्रीराम नवमी उत्सव उत्साहात महिला व बालकांच्या पोषणात लक्षणीय सुधारणेचे उदिष्ट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहनआदर्श फौंडेशनचा पुरस्कार प्रदान समारंभ उत्साहात बुवाबाजीविरोधात अंनिसची निदर्शने; नाट्यप्रयोगांतून करणार जनजागृती, १२ एप्रिलला बुवाबाजी विरोधी सत्यशोधन परिषदआरोग्य विज्ञान क्षेत्राला अधिकाधिक संशोधनाची गरज : ब्रिगेडिअर डेचेन चोएडेनइनोव्हेटर्स विद्यार्थ्यांना स्टार्टअप्ससाठी सुवर्णसंधी केआयटी च्या सहकार्याने मिळणार २-१० लाखाची डीएसटी इग्निशन ग्रांट उपलब्ध

जाहिरात

 

कृषी विभागामार्फत विविध पुरस्कार आता ऑनलाईन पध्दतीने स्विकारणार : कृषि मंत्री दत्तात्रय भरणे

schedule31 Mar 26 person by visibility 104 categoryराज्य

◼️सन २०२५ करीता विविध कृषी पुरस्कार बाबतचे अर्ज ऑनलाईन करण्यासाठी १५ एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ

मुंबई : कृषी विभागामार्फत देण्यात येणा-या विविध पुरस्कार प्रस्तावांची प्रक्रिया अधिक सुलभ, वेळबद्ध, पारदर्शक व प्रभावी करण्याच्या दृष्टीने कृषी विभागामार्फत पुरस्कार प्रस्ताव ऑनलाईन स्वरूपात स्वीकारण्यासाठी स्वतंत्र संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. सदर प्रणाली कृषी विभागाच्या संकेतस्थळावर (https://krishi.maharashtra.gov.in) कृषी पुरस्कार टॅब मध्ये उपलब्ध आहे.सन २०२५ करीता विविध कृषी पुरस्कार बाबतचे अर्ज ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे सादर करण्यास कृषी विभागाकडून मुदतवाढ देण्यात आलेली असून अंतिम मुदत दि.१५ एप्रिल २०२६ करण्यात येत आहे .तरी इच्छुक शेतकऱ्यांनी अर्ज करावेत असे आवाहन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.


महाराष्ट्र राज्य हे कृषि उत्पादन व कृषि उद्योग क्षेत्रात देशात अग्रगण्य राज्य म्हणून ओळखले जाते. राज्यामध्ये दरवर्षी शेती व पूरक क्षेत्रात अतुलनीय व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, महिला, व्यक्ती तसेचसंस्थांचा सन्मान महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत करण्यात येतो. यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न,वसंतराव नाईक कृषिभूषण,जिजामाता कृषिभूषण, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी,उद्यानपंडित पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), युवा शेतकरी पुरस्कार तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठीचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार इत्यादी पुरस्कारांचा समावेश आहे. हे पुरस्कार माननीय राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते प्रदान करून संबंधितांना सन्मानित करण्यात येते. यापूर्वी विविध कृषी पुरस्कारांचे प्रस्ताव चार प्रतींमध्ये ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येत होते.प्रस्ताव बनविण्यासाठी व आवश्यक कागदपत्र जमा करणेसाठी होणारा त्रास व लागणारा खर्च यामुळे सर्व इच्छुक शेतकरी अर्ज करू शकत नव्हते. या पारंपारिक पद्धतीमुळे प्रस्ताव सादरीकरण,पडताळणी व संकलनासाठी अधिक कालावधी लागत होता. या पार्श्वभूमीवर पुरस्कार प्रस्तावांची प्रक्रिया अधिक सुलभ, वेळबद्ध, पारदर्शक व प्रभावी करण्याच्या दृष्टीने कृषी विभागामार्फत पुरस्कार प्रस्ताव ऑनलाईन स्वरूपात स्वीकारण्यासाठी स्वतंत्र संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. सदर प्रणाली कृषी विभागाच्या संकेतस्थळावर (https://krishi.maharashtra.gov.in) कृषी पुरस्कार टॅब मध्ये उपलब्ध आहे. सदर संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून पुरस्कार प्रस्ताव सादरीकरण, तपासणी, मूल्यांकन तसेच अहवाल निर्मिती ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल स्वरूपात राबविणे शक्य होणार आहे. यामुळे पुरस्कार प्रक्रियेची कार्यक्षमता, विश्वासार्हता व परिणामकारकता अधिक बळकट होणार आहे. इच्छुक शेतकरी/व्यक्ती/संस्था/गट यांना सन २०२५ करीता विविध कृषी पुरस्कार बाबतचे अर्ज ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे सादर करणेची अंतिम मुदत दि.३१.०३.२०२६ होती.

परंतु online प्रणालीचे पहिलेच वर्षतसेच शेतकऱ्यांना पुरस्कारासाठी आवश्यक असलेला जिल्हा पोलीस अधिक्षक यांचेकडील चारित्र्य पडताळणी दाखला प्राप्त करून घेण्यास लागणारा कालावधी या कारणास्तव काही अर्ज शेतकरी स्तरावर प्रलंबित असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे शेतकरी स्तरावरून व क्षेत्रीय स्तरावरून सदरची मुदत वाढवून मिळणेबाबत होत असलेल्या मागणीच्या अनुषंगाने सन २०२५ करीता विविध कृषी पुरस्कार बाबतचे अर्ज ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे सादर करणेस कृषी विभागाकडून मुदतवाढ देण्यात आलेली असून अंतिम मुदत दि.१५ एप्रिल २०२६ करण्यात येत आहे .तरी इच्छुक शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीत अर्ज करणेबाबत आवाहन करणेत येत आहे .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes