SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई; १.७९ कोटींचा मुद्देमाल जप्त, गोव्याहून येणारा दारूचा ट्रक पकडलाकोल्हापुरात स्वामी अभेदानंदजींची व्याख्यानमाला; 'गीतेतील भक्ती, शक्ती आणि मुक्ती' विषयावर होणार प्रबोधनएप्रिल फूल डे: हास्याचा उत्सवअश्विनी भिडे मुंबई महानगरपालिकेच्या नव्या आयुक्त; बीएमसीला मिळाल्या पहिल्या महिला आयुक्तमराठी भाषेसाठी राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदानकृषी विभागामार्फत विविध पुरस्कार आता ऑनलाईन पध्दतीने स्विकारणार : कृषि मंत्री दत्तात्रय भरणेसंयुक्त संगमनगर तारदाळ श्रीराम चौक येथे श्रीराम नवमी उत्सव उत्साहात महिला व बालकांच्या पोषणात लक्षणीय सुधारणेचे उदिष्ट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहनआदर्श फौंडेशनचा पुरस्कार प्रदान समारंभ उत्साहात

जाहिरात

 

कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई; १.७९ कोटींचा मुद्देमाल जप्त, गोव्याहून येणारा दारूचा ट्रक पकडला

schedule01 Apr 26 person by visibility 109 categoryगुन्हे

कोल्हापूर :जिल्ह्यात अवैध व्यवसायांचे उच्चाटन करण्यासाठी पोलीस प्रमुख योगेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) शाहूवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचून गोवा बनावटीच्या दारूने भरलेला ट्रक जप्त केला असून, एकूण १ कोटी ७९ लाख ६ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, टाटा ट्रक (क्रमांक MH-27-BX-4756) मधून बांबवडे मार्गे कोल्हापूरच्या दिशेने अवैध दारूची वाहतूक होत होती. एलसीबीचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण व त्यांच्या पथकाने कापशी गावच्या बसस्टॉप चौकात हा ट्रक अडवला. चालकाची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र कसून तपासणी केली असता ट्रकमध्ये गोवा बनावटीच्या विदेशी दारूचे एकूण २४६८ बॉक्स मिळून आले. या दारूची किंमत सुमारे १ कोटी ६४ लाख ६ हजार २२० रुपये आहे.

याप्रकरणी ट्रकचालक संतोष बंडू पेटकर (रा. शिराळा नाका, इस्लामपूर) आणि माल पुरवणारा असीम अब्दुल्ला शेख (रा. देवास, मध्य प्रदेश) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शाहूवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई एलसीबीचे निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक निरीक्षक सागर वाघ, उपनिरीक्षक शेष मोरे आणि सुरेश पाटील, रामचंद्र कोळी, रुपेश माने यांच्या पथकाने केली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes