कोरे अभियांत्रिकीत अग्रणी महाविद्यालय अंतर्गत कबड्डी स्पर्धा उत्साहात
schedule29 Mar 25 person by visibility 197 categoryक्रीडा

वारणानगर : तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (ऑटोनोमस) अग्रणी महाविद्यालय अंतर्गत कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत एकूण ११ संघांनी सहभाग नोंदवला. मुलांच्या गटात टीकेआयइटी वारणानगर संघाने विजेतेपद पटकावले, तर जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग संघ उपविजेता ठरला. कुमार निरंजन पाटील याला उत्कृष्ट खेळाडूचा किताब मिळाला.
मुलींच्या गटात जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग संघाने विजेतेपद मिळवले, तर टीकेआयइटी वारणानगर संघ उपविजेता ठरला. वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष, डॉ. विनयरावजी कोरे व विजेत्या आणि सहभागी संघाचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन डायरेक्टर स्टुडंट अफेअर्स डॉ. कल्पना पाटील यांच्या हस्ते झाले. तर बक्षीस वितरण समारंभ वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कारजीन्नी यांच्या उपस्थितीत पार पडला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एन. माने, डॉ. एस. एम. पिसे (डीन, एसईटीएम), रजिस्ट्रार डॉ. एस. व्ही. खंडाळ, डॉ. एन. एस. धाराशिवकर (डीन, स्टुडंट अफेअर्स), प्रा. विकास माने (लीड कॉलेज समन्वयक), डॉ. व्ही. एम. शेटे, डॉ. यू. बी. देशन्नवर , संग्राम दळवी, प्रा. एस. एम. गिदवीर आदी मान्यवर उपस्थित होते.
या दोन्ही विजेत्या संघास प्रशिक्षक म्हणून प्रीतीश पाटील आणि अंकिता चव्हाण यांचं मार्गदर्शन लाभले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात विद्यार्थी प्रतिनिधी करण मुळीक ,गौरव कदम, विनय पाटील व सर्व विद्यार्थ्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले.