राज्य साखर संघाच्या स्पर्धेमध्ये कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे यश
schedule25 Nov 25 person by visibility 49 categoryक्रीडा
इचलकरंजी : महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या वतीने आयोजित स्पर्धेत कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी राजगोंडा आदगोंडा पाटील, दत्तात्रय लक्ष्मण गोरे आणि संदीप संभाजी चोपडे यांनी यश प्राप्त केले आहे.
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ निमित्त महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या वतीने राज्यातील सर्व साखर कारखान्यांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी प्रश्नमंजुषा, घोषवाक्य, पोस्टर व निबंध अशा चार स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये राज्यातील ५२ सहकारी साखर कारखान्यातील ४४९ प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला होता. त्यापैकी ३८९ सहभागी पात्र झाले होते.
कारखान्याचे संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे, ज्येष्ठ संचालक प्रकाश आवाडे, आमदार राहूल आवाडे व कार्यकारी संचालक मनोहर जोशी आणि सर्व संचालक मंडळ व अधिकारी आणि कामगार युनियन यांनी विजेत्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. कारखान्याच्या वतीने कामगारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वेळोवेळी विविध प्रकारे प्रोत्साहन दिले जात असते.
स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप. शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्लीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, जयप्रकाश दांडेगांवकर व मान्यवरांच्या हस्ते पुणे येथे संपन्न झाला. यावेळी कारखान्याचे बक्षिस विजेते तीन कर्मचारी, व्हाईस चेअरमन बाबासो चौगुले, संचालक प्रशांत कांबळे उपस्थित होते.