करवीर तालुक्यातील सरपंच पदाची मंगळवारी आरक्षण सोडत
schedule24 Jun 25 person by visibility 142 categoryराज्य

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या सन 2025 ते 2030 या कालावधीकरीता आरक्षण सोडत मंगळवार दिनांक 1 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता बहुद्देशीय हॉल, रमणमळा, कसबा बावडा, कोल्हापूर येथे काढण्यात येणार आहे.
या आरक्षणसाठी इच्छुकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करवीरचे तहसिलदार स्वप्निल रावडे यांनी केले आहे.