टीकेआयईटी पश्चिम महाराष्ट्रातील उत्कृष्ट इन्स्टिट्यूट
schedule24 Jun 25 person by visibility 249 categoryशैक्षणिक

वारणानगर : तुमच्या स्वप्नाच आकाश तुमच्या हाताशी असाव, तुमच्या बुद्धीच्या भरारीला कर्तृत्वाचे रूपड चढवण्यासाठी वारणा नगरच्या मातीत कार्यरत वारणा विद्यापीठ वारणानगर सलग्नित तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (ऑटोनोमस) होय. 1983 मध्ये या संस्थेची स्थापना झाली आहे. इन्स्टिट्यूट दोन वेळा एनबीए मानांकन तसेच 3.27 सीजीपीएससह नॅककडून ए ग्रेड तसेच एसीटीइ प्लॅटिनियम कॅटेगरी इन्स्टिट्यूट म्हणून सहा वेळा गौरव झाला आहे. त्याचबरोबर इन्स्टिट्यूट एआयसीटी नवी दिल्ली, व्हीटीएम मुंबई आणि वारणा विद्यापीठ वारणानगर यांच्याशी संलग्न आहे.
महाविद्यालयात टीसीएस स्पॉन्सर कम्प्युटर सायन्स आणि बिझनेस सिस्टीम सायबर सिक्युरिटी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स टेली कम्युनिकेशन इंजीनियरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, कंप्यूटर सायन्स अँड इंजीनियरिंग हे युजी कोर्सेस त्याचबरोबर पीजी कोर्सेस मध्ये स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, (CSE) मेकॅनिकल डिझाइन इंजिनिअरिंग, ई आणि टीसी, केमिकल इंजिनिअरींग, सायबर इंजीनियरिंग कोर्सेस त्याचबरोबर इंजीनियरिंग इलेक्ट्रॉनिक्स केमिकल इंजिनिअरिंग असे युजी आणि पीजी कोर्सेस विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणारे टीकेआयईटी म्हणजे इंजीनियरिंग क्षेत्रातील प्रकाशवाट म्हणून आपणही या वाटेवरचे पाईक व्हायला पाहिजे.
इन्स्टिट्यूटमध्ये अनुभवी शिक्षक, कर्मचारी वर्ग येथे कार्यरत असून 50 टक्के हून अधिक स्टाफ 20 ते 25 वर्ष शिक्षण क्षेत्रात अनुभवी असणारा आहे . 30 हून अधिक पीएचडी प्राप्त शिक्षक 150 हुन अधिकचा शिक्षक स्टाफ आणि शंभर शिक्षकेतर कर्मचारी या इन्स्टिट्यूट मधून ज्ञानदानाचे कार्य अविरत करत आहेत.
60 हजाराहून अधिक पुस्तकांनी सुसज्ज असणारे ग्रंथालय अभ्यासासोबतच क्रीडा आणि सांस्कृतिक सेल्स, गेट एमपीएससी कॉम्प्युटर परीक्षांसाठी व्यक्तिमत्व विकास आणि करिअर डेव्हलपमेंट सेल, एनसीसी, एनएसएस आदी विविध माध्यमातून मुलांची रुची जपण्याचा आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न येथे होतो.
त्याचबरोबर रेडी इंजिनिअरिंग प्रोग्राम, एप्पल ट्रेनिंग सेंटर, एआयसीटी आयडिया लॅब, नॅशनल सायबर सेक्युरिटी रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर ,
आणि मुलांच्यासाठी स्वतंत्र वस्तीगृह आणि खानावळ सुविधा तसेच 18हून अधिक मार्गावरती बसची सुविधा उपलब्ध आहे. प्लेसमेंटसाठी आंतरराष्ट्रीय कंपन्या इन्स्टिट्यूशनशी जोडल्या गेल्या आहेत. विद्यार्थ्यांना 100% इंटरशिप आणि प्लेसमेंट देणारे पश्चिम महाराष्ट्रातील उत्कृष्ट इन्स्टिट्यूट म्हणून उल्लेख करावा लागेल.
1992 मध्ये माजी विद्यार्थी संघटनेची स्थापना झाली असून 16 हजाराहून अधिक माजी विद्यार्थी यामध्ये सहभागी आहेत. मेरिटमध्ये असणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थी स्कॉलरशिप सुद्धा उपलब्ध आहे. शिक्षण आणि विद्यार्थी विकासाचा अखंड ध्यास घेतलेल्या या इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश घेण्यासाठी महाविद्यालयात भेट द्या अथवा संपर्क करा डॉ.अमोल पाटील - 9421261992, जालंधर जाधव- 7588838384, सुरज खोत - 9552354040
www.tkietwarana.ac.in