२० लाखांची मागणी, कोल्हापुरात माहिती अधिकार कार्यकर्ता जयराज कोळीला खंडणी घेताना अटक
schedule24 Jun 25 person by visibility 187 categoryगुन्हे

कोल्हापूर : येथील माहिती अधिकार कार्यकर्ता जयराज भिमराव कोळी (रा. हॉकी स्टेडियम कोल्हापूर) आणि त्याचा सहकारी युवराज मारूती खराडे (रा. उचगाव ता. करवीर) या दोघांना कागलजवळील लक्ष्मी टेकडीजवळ खंडणीची रक्कम घेताना रंगेहाथ पकडून अटक करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी केली यातील फिर्यादी हे वैद्यकीय उपकरण पुरवठादार असुन त्यांची पत्नी या सीपीआर हॉस्पीटल येथे बाँड प्रमाणे एम. डी. डॉक्टर म्हणुन सन 2024 ते मार्च 2025 पर्यत कार्यरत होत्या. यातील आरोपी जयराज कोळी याने फिर्यादी तसेच त्याचे पत्नीचे नावे वारंवार अर्ज करुन त्यांना त्रास देत होते. यातील आरोपीत कोळी याने फिर्यादी तसेच त्यांचे पत्नीचे नावे वारंवार केलेले खोटे अर्जाचा त्रास देणे थांबविणेसाठी त्याचा मित्र आरोपी युवराज खराडे यांनी संगणमत करुन फिर्यादीकडे 20 लाख रुपयाची खंडणी मागणी केली. ते पैसे फिर्यादी यांनी त्यांना दिलेनंतर ते फिर्यादीविरुध्द केलेले सर्व अर्ज व तक्रारी माघारी घेतो व पुन्हा त्यांना त्रास देणार नाही असे सांगुन, तसेच फिर्यादी यांनी त्यांना पैसे न दिलेस फिर्यादी यांना अशाच प्रकारे त्रास देवुन राज्यात कोठेही व्यवसाय करु न देणेची धमकी दिली.
त्यानंतर फिर्यादीशी अंतीम चर्चेअंती 15 लाख रुपये देण्याचे ठरले. वरील तारखेस वेळी व ठिकाणी आरोपीत मजकुर यांनी फिर्यादीस आरोपीत मजकुर यांना खंडणी स्वरुपात पैसे देण्याची इच्छा नसतानाही फिर्यादीकडुन 15 लाख रुपयाची खंडणी स्विकारलेबाबत यातील फिर्यादी यानी दिले फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला आहे.