कोल्हापूर : अट्टल मोटर सायकल चोरट्यास अटक; 12 मोटर सायकल जप्त
schedule13 Jan 25 person by visibility 484 categoryगुन्हे
कोल्हापूर : अट्टल मोटर सायकल चोरट्यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून 12 मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघड, 6,00,000/- रूपये किंमतीच्या 12 मोटर सायकल जप्त करण्यात आल्या.
या तपास पथकातील पोलीस अमंलदार लखन पाटील व सागर माने यांना खात्रीशिर गोपनीय माहिती मिळाली की, पोलीस अभिलेखावरील मोटर सायकल चोरी करणारा आरोपी अजय पटकारे, रा. कोल्हापूर याने केला असुन तो सध्या बेळंकी, ता. मिरज येथे गंगा गवाणे यांचे मेटकरी मळा येथील शेतात राहणेस असून त्याचेकडे सदर गुन्ह्यातील चोरलेली हिरो इग्नायटर मोटर सायकल आहे.
मिळाले माहितीचे अनुषंगाने तपास पथकाने दि. 13 जानेवारी रोजी बेळंकी, ता. मिरज येथे गंगा गवाणे यांचे मेटकरी मळा येथील शेतात जावून आरोपी नामे अजय बाळासो पटकारे, वय 41, रा. विचारेमाळ सिमा अपार्टमेंट समोर कोल्हापूर सध्या रा. गंगा गवाणे यांचे मेटकरी मळा शेतात बेळंकी, ता. मिरज जि. सांगली यास नंबर प्लेट नसलेल्या पांढरे रंगाचे हिरो इग्नायटर मोटर सायकलसह ताब्यात घेवून त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याचे कब्जात असलेली इग्नायटर मोटर सायकल ही चोरीची असून सदर बाबत शाहुपुरी पोलीस ठाणे, गु.र.नं. 16/2025, भा. ना. सं. कलम-303(2) प्रमाणे गुन्हा दाखल असलेची माहिती मिळाली. म्हणून त्यास सदर गुन्ह्याचे तपासकामी ताब्यात घेतले. सदरचा आरोपी हा पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असलेने त्याचेकडे कौशल्यपुर्ण अधिक तपास केला असता त्याने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातून एकूण 12 मोटर सायकल चोरीचे गुन्हे केलेची माहिती सांगितली.
सदर आरोपीकडून चोरीच्या गुन्ह्यातील एकूण 6,00,000/- रुपये किंमतीच्या 12 मोटर सायकली हस्तगत केल्या आहेत.
आरोपी अजय बाळासो पटकारे याचेविरुध्द यापुर्वी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात एकूण 27 मोटर सायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच पोलीस अंमलदार संजय कुंभार, लखन पाटील, सागर माने, शुभम संकपाळ, विजय इंगळे, संदिप बेंद्रे, विशाल चौगुले, महेश खोत, संजय पडवळ, अमित सर्जे, सचिन पाटील, विलास किरोळकर, महेश पाटील, संजय हुंबे, यशवंत कुंभार व शिवानंद मठपती यांनी केली आहे.
आरोपीकडून उघडकीस आले गुन्ह्यांची माहिती खालीलप्रमाणे-