SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर : राजेंद्र नगर परिसरात तणाव; अज्ञातांनी उभारले राष्ट्रपुरुषांचे पुतळेसंजय घोडावत इन्स्टिट्यूट चे प्रा. नितीन जाधव यांना "नॅशनल एज्युकेशन गोल्ड स्टार पुरस्कार"आ.सतेज पाटील यांचं दातृत्व.दुर्मिळ आजार झालेल्या ओवी पुजारीच्या उपचारासाठी मदतडॉक्टर्स चॅम्पियन ट्रॉफी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला उत्साहात प्रारंभसतेज पाटील पुणे शहर, जिल्ह्याचे निरीक्षकदेऊया गरजूंना साथ, सतेज पाटील यांच्या वाढदिनी मदतीचा हात; कार्यकर्त्यांच्या बैठकीत संकल्प : भव्यदिव्य स्वरुपात साजरा होणार वाढदिवसपुण्यात वेळेत उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले चौकशीचे आदेशग्रामपंचायत निवडणुकीसाठी सुधारित आदेश पारित; कोल्हापूर जिल्ह्यातील 1 हजार 26 ग्रामपंचायतींसाठी आरक्षण, तालुकानिहाय सरपंचपद आरक्षण निश्चित"चंद्रकांत चषक -२०२५" फुटबॉल स्पर्धेत बालगोपाल तालीम मंडळ, दिलबहार तालीम मंडळ (अ) विजयीसहकारी पतसंस्थांमधील पाच लाखापर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण मिळावे, राज्य पतसंस्था फेडरेशनच्या पदाधिकार्‍यांसह खासदार धनंजय महाडिक यांची केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांच्याशी भेट

जाहिरात

कोल्हापूर : सोनाळीतील बालकाचा अमानुष खून; आरोपीस आजन्म कारावासाची शिक्षा

schedule25 Feb 25 person by visibility 440 categoryगुन्हे

कोल्हापूर : सोनाळी (ता. कागल) येथील सात वर्षीय वरद गणपती पाटील या बालकाचे अपहरण करून त्याचा अमानुष खून झाला होता. याबाबत सोनाळी (ता. कागल) येथील दत्तात्रेय उर्फ मारुती तुकाराम वैद्य (वय ४६) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश के. बी. अग्रवाल यांनी मंगळवारी (दि. २५) दोषी ठरविले. त्यास आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. खटल्याच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. 

सदरचा गुन्हा हा  सावर्डे बुद्रुक ता. कागल जि. कोल्हापूर गावचे हद्दीत दत्तात्रय शंकर म्हातुगडे यांचे खडकगल्ली येथील नवीन घरापासून ते आनंदा धोंडीराम जाधव यांचे खुळा पिंपळ नावचे शेत जमीन गट नं २७२५ या निर्जन ठिकाणी दि. १७/ ऑगस्ट/२०२१ इ रोजी रात्री २०.१५ वा. ते २१.०० वा. चे दरम्यान हा गुन्हा घडलेला आहे. सदर गुन्हातील फिर्यादी व आरोपी हे एकमेकांचे मित्र असून ते दि. १७/ ऑगस्ट/२०२१ इ रोजी फिर्यादी यांचे मेव्हणे प्रथमेश म्हातुगडे रा. सावर्डे बुद्रुक या गावी यांचे नवीन घराचे वास्तुःशांती कार्यक्रमासाठी सोबत गेले होते. यातील आरोपी याने वरदच्या मामाच्या घरी वास्तुः शांती निमित्त रात्रीच्या वेळी जेवनाचा कार्यकम सुरु असताना आरोपीने मयत वरद यास गोड बोलून आनंदा धोंडीराम जाधव यांचे खुळा पिंपळ नावचे शेत जमीन गट नं २७२५ मध्ये रात्रीचा फायदा घेवून अंधारातून वरद यास घेवून गेला व त्यास जिवे ठार मारुन पुरावा नष्ट करणेच्या उददेशाने वरदचा मृतदेह गावाबाहेरील झुडपात लपवून ठेवून सदरचे कृत्य आपण केले नाही असे भासविणेचा प्रयत्न आरोपीने वरदचा शोध सुरु असताना केला होता.

याबाबत मुरगुड पोलीस ठाणे मध्ये गुन्हा दाखल करणेत आला होता सदर गुन्हयाचे कामी तपास सुरु असताना फिर्यादीचे मेहुणे व आत्तेभाऊ हे जेव्हा रात्रीच्या वेळी वरदचा शोध घेत होते तेव्हा रात्री ९ वाजता सावर्डे गावचे तळयाजवळील चौकात आरोपी मारुती हा दत्त मंदीराकडून येताना दिसला होता. त्यावेळीही त्यास वरद हा कुठे दिसला का असे विचारले असता त्याने वरद दिसला नाही असे खोटे सांगितले. त्यानंतर सायंकाळी खडक गल्ली तालीम चौकातील एका लहान मुलगी आपलया पाळीव कुत्र्याला फिरायला घेवून गेली असता वरद व त्याचा मित्र दक्ष माने हे सोबत खेळत होते त्यावेळी आरोपी मारुती वैध हा देखील त्यावेळी तेथे उपस्थित असलेबाबतचे तपासाच्या वेळी समजले मुळे आरोपीवरती संशय निर्माण होवून आरोपीस ताब्यात घेवून कसून चौकशी केली असता आरोपीने वरद यास पळवून निर्जन ठिकाणी नेवून त्याचे तोंड व गळा दाबून जिवे ठार मारुन पुरावा नष्ट करणेच्या उददेशाने वरदचा मृतदेह गावाबाहेरील झुडपात लपवून ठेवून सदरचे कृत्य आपण केले नाही असे भासविणेचा प्रयत्न केल्याबाबतचा गुन्हा केलेचे निष्पन्न झालेने आरोपी विरुध्द  गुन्हा नोंद करणेत आला होता.


या खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश  श्रीमती. के. बी. अग्रवाल यांचेसमोर झाली. याकामी प्रथम विशेष सरकारी वकील  उमेशचंद्र यादव यांनी काही साक्षीदार तपासले. मात्र उर्वरित खटला जिल्हा सरकारी वकील अॅड. विवेक हरिभाऊ शुक्ल यांनी चालविला. न्यायाधीशांनी आरोपी दत्तात्रय उर्फ मारुती तुकाराम वैध यास पुढील प्रमाणे शिक्षा सुनाविली आहे. 

१. आरोपी यास भारतीय दंड विधान संहिता कलम ३६४ (अपहरण करणे) खाली दोषी ठरवून आजन्म कारावासाची शिक्षा व २०००/- रुपये दंड, दंड न दिलेस तीन महिने साधी कैद.

२. आरोपी यास भारतीय दंड विधान संहिता कलम ३०२ (खून करणे) खाली दोषी ठरवून आजन्म कारावासाची शिक्षा व २०००/- रुपये दंड, दंड न दिलेस तीन महिने साधी कैद.

३. आरोपी यास भारतीय दंड विधान संहिता कलम २०१ (पुरावा नष्ट करणे) खाली दोषी ठरवून तीन वर्षे साधी कैद व १०००/- रुपये दंड, दंड न दिलेस एक महिने साधी कैद. अशा शिक्षा ठोठावल्या आहेत.

सरकारपक्षातर्फे अॅड.  विवेक हरिभाऊ शुक्ल यांनी काम पाहीले. या गुन्हयाचा प्राथमिक तपास  कुमार ढेरे पोलीस उपनिरिक्षक मुरगूड व  विकास बडवे सहाय्यक पोलीस निरिक्षक मूरगूड यांनी केला. तथापी गुन्हयाचे गांर्भीय लक्ष्यात घेवून या गुन्हयाचा तपास  राजाराम आर पाटील पोलीस उप अधिक्षक करवीर यांनी केला. व शेवटी दोषारोप पत्र प्रिया नानासाहेब पाटील यांनी पाठविले तसेच कोर्ट पैरवी संजय पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल,  मुरगूड पोलीस ठाणे कोल्हापूर यांनी याकामी मदत केली.

जाहिरात

Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes