कोल्हापूर : राजेंद्र नगर परिसरात तणाव; अज्ञातांनी उभारले राष्ट्रपुरुषांचे पुतळे
schedule05 Apr 25 person by visibility 270 categoryराज्य

कोल्हापूर : राजेंद्रनगर येथील मुख्य चौकात काही अज्ञातांनी रात्री डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पुतळे उभे केले. शनिवारी (दि. ५) सकाळी हा प्रकार निदर्शनास येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुतळे हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिकांनी विरोध केल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
राजेंद्रनगर चौकात खाजगी रिकाम्या जागेत अज्ञातांनी पहाटे दोन चबुतरे बांधले. त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पुतळे उभे केले.
राजारामपुरी पोलिसांनी पुतळे तातडीने काढून घेण्याची विनंती स्थानिकांना केली. मात्र, पुतळे न हटवण्यावर स्थानिक ठाम आहेत. त्यामुळे परिसरामध्ये तणाव निर्माण झाला आहे.