कोल्हापूर: उसाच्या शेतातून अडीच लाखांचा गांजा जप्त; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
schedule10 May 26 person by visibility 98 categoryगुन्हे
कोल्हापूर: जिल्हयातील पन्हाळा तालुक्यातील मरळी येथे उसाच्या शेतात लावलेली गांजाची झाडे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धाड टाकून जप्त केली आहेत. या कारवाईत सुमारे २५ किलो वजनाचा ओला गांजा हस्तगत करण्यात आला असून, त्याची बाजारपेठ किंमत २ लाख ४२ हजार ७०० रुपये इतकी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मरळी गावच्या हद्दीत 'आडाजवळाचे शेत' नावाच्या उसाच्या फडात गांजाची बेकायदेशीर लागवड करण्यात आल्याची गोपनीय माहिती पोलीस अंमलदार सत्यजित तानुगडे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने १० मे २०२६ रोजी छापा टाकला.
या प्रकरणी शेतमालक *भिकाजी शिवा पाटील (वय ६५, रा. मरळी) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध कळे पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.