SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर: उसाच्या शेतातून अडीच लाखांचा गांजा जप्त; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाईकागलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण वूलू स्वच्छतागृह महिला भाविकांसाठी आधारवड, मातृ दिनाचे औचित्य साधून भाजपची कोल्हापूरकरांना अनोखी भेट : भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक म्युझिकल फौंऊटेनच्या कामात कोणतीही तडजोड नको : आमदार राजेश क्षीरसागरमातृत्वाची महानता: आईच्या अपार मायेचा उत्सवथलपति विजय यांच्या राजकीय पर्वाचा भव्य श्रीगणेशा; समर्थकांच्या जनसागरासमोर घेतली निष्ठेची शपथ!महिला व बाल विकास विभागातील बदल्या आता केंद्रित ऑनलाइन पद्धतीनेजागतिक ल्युपस दिन: एक अदृश्य लढाई आणि जनजागृतीचा संकल्परायगड जिल्ह्यातील वादळी वाऱ्यांचा फटका बसलेल्या नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत द्यावीविनापरवाना शेतमाल खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणार : पणन मंत् जयकुमार रावल

जाहिरात

 

वूलू स्वच्छतागृह महिला भाविकांसाठी आधारवड, मातृ दिनाचे औचित्य साधून भाजपची कोल्हापूरकरांना अनोखी भेट : भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक

schedule10 May 26 person by visibility 176 categoryराज्य

कोल्हापूर  : महिलांसाठी खासबाग मैदान आणि ताराबाई पार्क इथं बांधलेल्या महिला स्वच्छतागृहांचे लोकार्पण महापौर सौ. रुपाराणी निकम, कोल्हापूर जिल्हापरिषद अध्यक्ष सौ. शिल्पा खोत व भागीरथी महिला संस्था अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक ह्यांच्या शुभ हस्ते पार पडले. 
महिला भाविक, पर्यटकांसह कोल्हापुरातील महिलांसाठी आता वातानुकूलित सर्व सुविधांनी युक्त स्वच्छतागृह उपलब्ध झाले आहे. ह्या स्वच्छता गृहाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तर आहेच पण हे स्मार्ट सॅनिटेशन सोल्यूशन आहे. स्वच्छता गृहाला जोडूनच महिलांच्या गरजेच्या वस्तु विक्रीसाठी दुकान असल्याने बचत गटातील महिलांना रोजगार सुद्धा उपलब्ध झाला आहे. 
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाईच्या दर्शनासाठी तसेच पन्हाळा ज्योतिबा दर्शन आणि पर्यटनासाठी दररोज हजारो भाविक कोल्हापुरात येत असतात. महिला भाविकांसाठी कोल्हापुरात सार्वजनिक स्वच्छतागृह उपलब्ध नाहीत. त्यामुळे वारंवार कोल्हापूरची नाचक्की होत होती. दरम्यान कोल्हापुर महापालिकेत महायुतीची सत्ता आल्यानंतर महिला स्वच्छतागृहांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला. २५ वर्षाची मागणी पूर्ण करण्याच्या उद्देशानं स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिकाच्या माध्यमातून भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी पाठपुरावा केल्यानंतर तात्काळ राज्य शासनाचा निधी उपलब्ध झाला. या माध्यमातून कोल्हापूर शहरातील खासबाग मैदान चौक, आणि ताराबाई पार्क इथल्या एसटी कार्यशाळेबाहेरील जागेत महिलांसाठी स्वच्छतागृह उभारणीच्या कामाला प्रारंभ झाला. दोन महिन्यात ही स्वच्छतागृहं बांधून तयार झाली असून, महिलांसाठी सर्व सुविधांयुक्त अशी ही स्वच्छतागृहे आहेत. शहरातील खासबाग मैदान,  आणि ताराबाई पार्क इथं ही महिला स्वच्छतागृह उभारली आहेत. त्यांचा लोकार्पण सोहळा रविवार १० मे रोजी महापौर सौ. रुपारणी निकम, कोल्हापूर जिल्हापरिषद अध्यक्ष सौ. शिल्पा खोत व भागीरथी महिला संस्था अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक ह्यांच्या शुभ हस्ते व खासदार श्री धनंजय महाडिक, आमदार श्री. अशोकराव माने, उप महापौर श्री अक्षय जरग, सभापती श्री विशाल शिराळे, गटनेते श्री आदिल फरास, श्री मुरलीधर जाधव,  श्री शारंगधर देशमुख यांच्या उपस्थिती मध्ये पार पडला.   

या प्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी मनोगत व्यक्त करताना वूलू ह्या स्वच्छता गृहांच्या आधुनिकता, स्वच्छता व सुरक्षा ह्या विषयी माहिती दिली. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत असताना वूलू स्वच्छता गृहाची संकल्पना ही स्वच्छ भारत अभियानाच्या प्रेरणतूनच जन्माला आली असे प्रतिपादन केले. उत्तरार्धा मध्ये त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, संपूर्ण कोल्हापूर महानगर पालिका यांचे आभार मानले व वूलू चे कोल्हापूर मॉडेल हे संपूर्ण भारत देशामध्ये प्रेरणा ठरेल असा आत्मविश्वास व्यक्त केला. सोबतच  खासदार  धनंजय महाडिक यांनी मनोगत व्यक्त करताना कोल्हापूर महानगरपालिके मध्ये महायुती सरकार आल्यापासून जनतेला दिलेले अभिवचन अश्याच पद्धतीने पूर्ण करू असा विश्वास दिला. कोल्हापूर महानगर पालिकेच्या महापौर रुपाराणी निकम यांनी ही मनोगत व्यक्त केले.  दरम्यान भाजपाचे प्रदेश सचिव महेश जाधव, चॅनल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक आश्किन आजरेकर, प्रकाश गवंडी, पूर्वा राणे, माधुरी नकाते, पल्लवी देसाई, रेखा उगवे, माधुरी व्हटकर, दीपा काटकर, सुरेखा ओटवकर, नेहा तेंडुलकर, अर्चना कोराणे, विजय खाडे पाटील, सृष्टी जाधव, दीपा ठाणेकर, महेश वासुदेव, उत्तम पाटील, युवा मोर्चाचे विश्वजीत पोवार यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes