कोल्हापूर : प्रशांत कोरटकरला ३ दिवसांची पोलिस कोठडी
schedule25 Mar 25 person by visibility 286 categoryगुन्हे

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केल्यानंतर पत्रकार प्रशांत कोरटकर यांना मंगळवारी तेलंगणा येथून अटक करण्यात आली. आज पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले. त्यानंतर न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.
महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील सत्र न्यायालयाने मंगळवारी पत्रकार प्रशांत कोरटकर यांना २८ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप आहे. नागपूर येथील रहिवासी असलेल्या कोरटकरला महाराष्ट्र पोलिसांनी सोमवारी तेलंगणा येथून अटक केली.
२६ फेब्रुवारी रोजी त्यांच्या आणि कोल्हापूरचे इतिहासकार इंद्रजित सावंत यांच्यातील संभाषणाच्या ऑडिओच्या आधारे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान कोल्हापूरमध्ये शिवप्रेमी यांनी संताप व्यक्त करत प्रशांत कोरटकर याच्या विरोधात रोष व्यक्त केला. तसेच त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचे समजते. त्याच्यावर कोल्हापूर चप्पल भिरकावण्यात आली. यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. दरम्यान शिवप्रेमीचा तीव्र विरोध पाहता जुना राजवाडा पोलिसांनी प्रशांत कोरटकर ला छुप्या मार्गाने न्यायालयात हजर केले. जुना राजवाडा पोलीस स्टेशन आणि न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.