अज्ञात वाहनाच्या धडकेत कागलचा युवक ठार
schedule24 Sep 24 person by visibility 244 categoryगुन्हे
कोल्हापूर : अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने रियाज इस्माईल नाईकवाडे (वय ३८, सध्या रा. कागल) हा मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला. हा अपघात सोमवारी रात्री उशिरा घडला.
रियाज नाईकवाडे याचे कागलमध्ये चप्पलचे दुकान आहे. तो मोटारसायकल वरुन कोल्हापूरहून कागलकडे येत होता. दरम्यान, लक्ष्मी टेकडीपासून काही अंतरावर असलेल्या विकासवाडी फाट्याच्या समोर रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनानेत्याला जोराची धडक दिली. त्यात तो जागीच ठार झाला.
याबाबतची फिर्याद झाकीर हारूण नाईकवाडे यांनी कागल पोलिसात दिली आहे.