कोल्हापूर परिक्षेत्रीय क्रिडा स्पर्धा 2025 मध्ये कोल्हापूर जिल्हयाचे घवघवीत यश
schedule23 Nov 25 person by visibility 43 categoryक्रीडा
कोल्हापूर : कोल्हापूर परिक्षेत्रीय क्रिडा स्पर्धा सन 2025 अंतर्गत कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापुर ग्रामीण, सोलापुर आयुक्तालय या जिल्हयाचे संघांच्या स्पर्धा बुराणपुर बारामती जि. पुणे येथे दिनांक 17 ते 21 खाली नोव्हेंबर या कालावधीमध्ये उत्साहात पार पडल्या . कोल्हापूर परिक्षेत्रिय क्रिडा स्पर्धेमध्ये काल्हापूर पोलीस दलास सांघीक व वैयक्तीक खेळामध्ये भरघोस यश मिळाले.
या स्पर्धेमध्ये जिल्हा पोलीस दलाचे पुरुष फुटबॉल संघाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला असुन संघास सुवर्णपदक प्राप्त झालेले आहे, तसेच हॉकी या खेळामध्ये सुध्दा प्रथम क्रमांक प्राप्त झाला असुन संघांस सुर्वणपदक प्राप्त झालेले आहे. त्याप्रमाणे बास्केटबॉल व हँडबॉल या खेळामध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त झालेला असुन सिल्वर पदक प्राप्त झालेले आहे. हॉलीबॉल, कबड्डी या खेळामध्ये कोल्हापुर जिल्हा पोलीस दलाचा तृतीय क्रमांक प्राप्त झालेला असुन संघास ब्राँझ पदक प्राप्त झालेले आहे.
तसेच कोल्हापूर जिल्ह्यात पोलीस दलाचे पुरुष पोलीस खेळाडु यांना त्याचे वैयक्तीक खेळामध्ये वेगवेगळी पदके प्राप्त झालेली आहे. त्यामध्ये कुस्ती, जुदो, वु शु, तायकांदो स्पर्धेमध्ये जिल्हा पोलीस दलाचा सर्वसाधारण पद द्वितीय क्रमांक प्राप्त झालेला आहे. तसेच ॲथलॅटिक्स स्पर्धेमध्ये कोल्हापुर जिल्हा पोलीस दलाचा द्वितीय क्रमांक प्राप्त झालेला आहे. जलतरण स्पर्धेमध्ये सर्वसाधारण द्वितीय क्रमांक प्राप्त झालेला आहे. बॉक्सींग या स्पर्धेमध्ये सर्वसाधारण तृतीय क्रमांक प्राप्त झालेला आहे.
कोल्हापूर परिक्षेत्रिय क्रिडा स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्हयाच्या महिला पोलीस संघाने सुध्दा उल्लेखनिय कामगिरी पार पाडली आहे. हॉलिबॉल या क्रिडा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे. बॉस्केटबॉल या क्रिडा स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त झालेला आहे. ॲथलॅटीक या स्पर्धेमध्ये सर्वसाधारण द्वितीय क्रमाक प्राप्त झालेला आहे. व शु तायकांदो या क्रिडा स्पर्धेमध्ये महिला संघांस सर्वसाधारण द्वितीय क्रमांक प्राप्त झालेला आहे. कुस्ती व जुदो या स्पर्धेमध्ये सर्वसाधारण तृतीय क्रमांक प्राप्त झालेला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग श्रीमती प्रिया पाटील, यांनी क्रिडा स्पर्धेमध्ये कोल्हापुर जिल्हयाचे टीम मॅनेजर व खेळाडू म्हणुन नेतृत्व केले आहे. सदरची क्रिडा स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाचे महिला व पुरुष खेळाडुंनी भरघोस यश प्राप्त केलेले आहे. सर्व स्पर्धकांना जिल्हयाचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक डॉ बी धीरजकुमार, पोलीस उपअधीक्षक श्री. तानाजी सांवत, राखीव पोलीस निरीक्षक राजकुमार माने, क्रिडा प्रमुख पोलीस हवलदार बाबासो दुकाने व इतर नेमणुक करण्यात आलेल्या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभलेले आहे.