SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
प्रभाग क्रमांक 11 मधील सत्यजीत जाधव यांच्या प्रचारार्थ सिद्धाळा, टिंबर मार्केट परिसरात प्रचार फेरीसन्मान योजनेसह शासन दरबारी पत्रकारांच्या प्रलंबित प्रश्नांवर विधिमंडळात आवाज उठवणार ; आमदार सतेज पाटील यांची ग्वाही भारतीय जनता पक्षाकडून जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीची तयारी सुरू, इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेवून आजमावली मतेसंजय घोडावत विद्यापीठात एआययू पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय टेनिस स्पर्धांचे आयोजनडी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंगच्या १० विद्यार्थ्यांची क्यू-स्पायडर्स निवडमतदान प्रक्रिया समजून घेण्यासाठी 3096 अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतले दुसरे प्रशिक्षणमहानगरपालिकेच्या गुणवंत विद्यार्थ्यांची इस्रो अभ्यास सहलीसाठी विमानातून भरारीशिवाजी विद्यापीठात आकर्षक शोभायात्रेने ‘शिवस्पंदन’ सुरूसैन्य दलामध्ये मोफत प्रशिक्षणासाठी आता 15 ऐवजी 13 जानेवारीस मुलाखतप्रभाग क्रमांक 13 मधून ओंकार जाधव यांच्या प्रचारार्थ फेरी; मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जाहिरात

 

कोल्हापूर मेडीकल असोसिएशनच्या (केएमए) वतीने दोन दिवसीय वैद्यकिय परिषदेचे आयोजन

schedule28 Oct 25 person by visibility 340 categoryआरोग्य

कोल्हापूरः कोल्हापूर मेडिकल असोसिएशन शाखा इंडियन मेडिकल असोसिएशन या डॉक्टरांच्या शिखर संस्थेच्या वतीने येत्या १ व २ नोव्हेंबर रोजी शनिवारी आणि रविवारी दोन दिवसीय वैद्यकिय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शतकोतर रौप्यमहोत्सवात प्रवेश करीत असलेल्या या परिषदेचे या वर्षीचे घोषवाक्य 'Facing the future together-From connection to cure' असे आहे. हा शब्दप्रयोग असे सुचीत करतो की, वैद्यकीय दृष्टीकोन केवळ शारिरीक लक्षणांच्या उपचारापुरता मर्यादित न ठेवता तो मानसिक व भावनिक आरोग्याकडेही केंद्रीत झाला पाहिजे. दृढ सामाजिक नातेसंबंध है शरीर, मन आणि आत्म्यासाठी औषधाप्रमाणे काम करतात ही या संकल्पनेची मध्यवर्ती भुमिका आहे.

कोल्हापूर आणि परिसरातील वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांना वैद्यकशास्त्रातील नव्या घडामोडी, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नव्या संशोधनाची ओळख करून देणे, हा केएमकॉन या वैद्यकीय परिषदेचा मुख्य हेतू आहे. अशी माहिती कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आर.एम. कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

या दोन दिवसांच्या कार्यक्रमात देश-विदेशातील प्रख्यात तज्ज्ञांचा समावेश असून सर्व पॅथींचा समावेश असणारी मार्गदर्शनपर व्याख्याने, परिसंवाद, चर्चासत्रे, प्रश्नोतरे असणार आहेत.

प्रख्यात तज्ञांमधे मुंबईचे नामवंत हेमॅटॉलॉजिस्ट डॉ. एम. बी. अगरवाल, न्यूरॉलॉजिस्ट डॉ. सतीश खाडिलकर, सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथील क्रिटिकल केअर तज्ज्ञ डॉ. उमेश शहा, पुण्याचे अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. एन. जे. कर्णे, डायबेटॉलॉजिस्ट डॉ. शैलजा काळे, वंध्यत्वतज्ज्ञ डॉ. सुप्रिया पुराणिक, यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. बिपीन विभुते आणि डॉ. हंचनाळे, बेंगळुरूचे न्यूरोसर्जन डॉ. विकास, बालहृदयरोगतज्ज्ञ डॉ. विजयलक्ष्मी, आदि तज्ञ डाक्टर्स आपल्या व्याख्यानांद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन करतील.

अपोलो हॉस्पिटल, ज्युपिटर हॉस्पिटलमधील तसेच कोल्हापूर परिसरातील अनेक अनुभवी व तज्ञ डॉक्टरदेखील लिव्हरचे आजार, कॅन्सर वरील नविन उपचार, अवयव प्रत्यारोपण, वंध्यत्व चिकित्सा, पोटविकार निदान अशा विविध विषयांवर आपले विचार व तंत्रप्राविण्य सादर करतील.
परिषदेचा उद्घाटन सोहळा शनिवार, १ नोव्हेंबर रोजी सायं. ६.३० वा. होणार असून, महाराष्ट्र विधानपरिषदेचे अध्यक्ष मा. प्रा. राम शिंदे हे या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी असतील. विशेष निमंत्रित म्हणून डॉ. एस. व्ही. शर्मा (उपसंचालक, इस्रो) आणि डॉ. आय. बी. विजयलक्ष्मी उपस्थित राहणार आहेत. तसेच मा. आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार सतेज पाटीलआणि आमदार अमल महाडिक है मान्यवर अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

असोसिएशनव्दारे दरवर्षी दिला जाणारा डॉ. अतुल जोगळेकर जीवनगौरव पुरस्कार या वर्षी ख्यातनाम स्त्रीरोग व वंध्यत्व तज्ञ डॉ. सतीश पत्की यांना देण्यात येणार असून २ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता हा कार्यक्रम संपन्न होईल. या परिषदेकरिता सुमारे ७०० प्रतिनिधींनी नोंदणी केली असून, अजूनही अनेक डॉक्टर नोंदणी करत आहेत.

या परिषदेचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे "डॉक्टर आणि जनतेसाठी खुला आरोग्य संवाद " याद्वारे 'मधुमेह, आहार, हुदय आणि स्वस्थता' या विषयावर आधारित सार्वजनिक चर्चासत्र रविवार, २ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० ते ५.३० या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. या चर्चासत्रात प्रसिध्द आहरतज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित, योगतज्ञ डॉ. समप्रसाद विनोद आणि हृदयरोगतज्ञ डॉ. आय. बी. विजयलक्ष्मी आपले विचार मांडणार आहेत.

आयोजक समितीने सर्व डॉक्टरांना या परिषदेस उपस्थित राहण्याचे आणि जनतेला विनामुल्य सार्वजनिक चर्चासत्रात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes