कोल्हापूर महापालिकेच्या वतीने अंतिम प्रारूप प्रभाग रचना जाहीर
schedule10 Oct 25 person by visibility 78 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने अंतिम प्रारूप प्रभाग रचना आज सकाळी छत्रपती ताराराणी सभागृह (स्थायी समिती हॉल) येथे जाहीर करण्यात आली. या प्रसंगी सर्व प्रभागांचे नकाशे सभागृहात प्रदर्शित करण्यात आले असून, नागरिकांना सोयीसाठी हे नकाशे महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
नागरिकांना त्यांच्या प्रभागाची माहिती आणि नकाशा पाहता यावा यासाठी https://web.kolhapurcorporation.gov.in/getElectionListByYear?ele_ele_yr_id=4 या लिंकवर नकाशे उपलब्ध आहेत.
या माध्यमातून नागरिकांना पारदर्शक आणि सुलभ माहिती उपलब्ध व्हावी हा उद्देश असून, कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक के मंजूलक्ष्मी यांनी सदरचे नकाशे पहावे असे आवाहन केले आहे.