जिल्हास्तरीय मुलींच्या खो खो स्पर्धेत मेन राजाराम प्रशाला अव्वल
schedule10 Oct 25 person by visibility 111 categoryक्रीडा

कोल्हापूर : समृद्ध शिक्षणाची वैभवशाली परंपरा असणाऱ्या करवीर नगरीतील जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित मेन राजाराम हायस्कूल अँन्ड ज्युनिअर कॉलेजने शालेय महापालिकास्तरीय १७-१९ वर्षाखालील मुलींच्या खो-खो स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करून उल्लेखनीय यश मिळवत अव्वल ठरले आहे.
महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समिती व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालातर्फे संभाजीनगर येथील विभागीय क्रीडा संकुलात १७-१९ वर्षाखालील मुलींच्या खो-खो स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये मेन राजाराम प्रशालेच्या विद्यार्थिनीनी उत्कृष्ट खेळाच्या जोरावर विजेतेपद पटकावले आहे.विजय संघामध्ये अनुष्का पाटील, सलोनी जामदार, सनिका चाफे, संगीता फाले, श्रावणी लक्ष्मण पाटील, श्रावणी दीपक पाटील, वैष्णवी पाटील, दीक्षा पाटील, आशाराणी पोवार, अर्चना माने, अमृता पाटील, सिद्धी माने यांचा समावेश होता.
डेरवण, चिपळूण येथे दिनांक १३ ते१४ ऑक्टोंबर दरम्यान होणाऱ्या विभागीय शालेय खो खो स्पर्धेसाठी या संघाची निवड झाली आहे. विभागीय स्पर्धेसाठी झालेल्या या निवडीने मेन राजाराम प्रशालेच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला आहे.संघाला प्रशिक्षक बी. आर. भांदिगिरे, क्रीडा शिक्षक प्रा. बी. पी. माळवे यांचे अनमोल मार्गदर्शन मिळाले. तर प्राचार्य डॉ. जी. व्ही. खाडे, उपप्राचार्या श्रीमती व्ही. ए. खडके, प्रा.संजय कुंभार यांचे प्रोत्साहन मिळाले. प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांनी खेळाडूंचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले.
प्राचार्य डॉ . जी. व्ही. खाडे, उपप्राचार्या श्रीमती व्ही. ए. खडके, प्रा.संजय कुंभार यांच्या सहित सर्व काॅलेजचे अधिकारी व पदाधिकारी, शिक्षक यांनी या यशाबद्दल अभिनंदन करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.