ऑलिम्पिकमध्ये कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेचा पराक्रम; भारताला तिसरं 'ब्राँझ'
schedule01 Aug 24 person by visibility 295 categoryक्रीडा
नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळेने 50 मीटर रायफल श्री पोझिशनच्या प्रकारात कांस्य पदक पटकावले आहे. या स्पर्धेत स्वप्नीलने एकुण 451.4 गुण प्राप्त केले. चीनचा लिऊ युकुनने सुवर्णपदक जिंकले. त्याचे गुण 463.6 होते. तर युक्रेनच्या कुलिस सेरहीने रौप्य पदक पटकावले.
भारताचं पॅरिस ऑलिम्पिकमधील हे तिसरं कांस्य पदक आहे. स्वप्नील कुसाळे हा महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील कांबळवाडी गावातील असून तो 2012 पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे.
स्वप्नीलने ऐतिहासिक कांस्य पदक जिंकले. विशेष बाब म्हणजे खाशाबा जाधव यांच्यानंतर पदक जिंकणारा स्वप्नील महाराष्ट्रातील पहिला खेळाडू ठरला आहे.