कोल्हापूरकरांचे लाडके "यामिनी" प्रदर्शन सज्ज; रोटरी क्लब ऑफ गार्गीजतर्फे २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान मेघमल्हार हॉलमध्ये आयोजन!
schedule22 Sep 26 person by visibility 100 categoryसामाजिक
कोल्हापूर : दसरा दिवाळी जवळ येताच कोल्हापूरच्या जनतेला वेध लागतात ते यामिनी या प्रदर्शनाचे. दरवर्षीच्या वाढत्या प्रतिसादामुळे रोटरी क्लब ऑफ गार्गीजने या ही वर्षी हे प्रदर्शन २६, २७ आणि २८ सप्टेंबर २०२६ रोजी मेघमल्हार हॉल, सयाजी हॉटेल, कोल्हापूर येथे आयोजित केले आहे. यामिनी प्रदर्शनाचे हे तेरावे यशस्वी वर्ष असून या वर्षी प्रदर्शनात एक्स्क्लुझिव्ह रिअल ज्वेलर्स विथ युनिक डिझाईन्स, पोल्की, रिअल डायमंड्स, लॅबग्रोन डायमंड्स, संपूर्ण भारतामधील तसेच मुंबई, पुणे, सुरत, इंदोर, जयपूर, गोवा, बेंगलोर, दिल्ली येथील विविध प्रकारच्या होम डेकोर्स फॉर फेस्टिव्हल्स स्टॉल्स असे ११५ हुन अधिक स्टॉल्स असलेले हे यामिनी प्रदर्शन भरविण्यात आले आहे अशी माहिती अध्यक्ष सविता पदे, यामिनी चेयरमन डॉ हेमलता कोटकर, सचिव सीमा मलानी, रोटरी सदस्या साधना घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या प्रदर्शनाचे उद्घाटन दिनांक २६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता महापौर रुपाराणी निकम यांच्या हस्ते होणार आहे. आजपर्यंत रोटरी क्लब ऑफ गार्गीजने विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. अनेक गरजूंना मदत केली आहे.
शिवाय समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचून महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची उमेद देणे हा मुख्य उद्देश प्रदर्शनाचा असतो. त्यामुळे बचत गट यांनीही बनविलेल्या वस्तू प्रदर्शनात बघायला मिळणार आहेत. या प्रदर्शनातून उपलब्ध निधीतून विविध सामाजिक उपक्रम, महिला सबलीकरण, गरजूंसाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, मुलींसाठी सर्वाइकल कॅन्सरचे वैक्सीन, पोलिओ मुक्तीसाठी रोटरी समूहाचा सिंहाचा वाटा आहे.
महिलांसाठी उपयुक्त असणारी माहिती मिळावी यासाठी चर्चासत्र आयोजित केले जातात. सामाजिक भान ठेऊन सामजिक प्रकल्प राबविण्यावर अधिक भर दिला जातो. अशा विविध उपक्रमासाठी हा निधी वापरला जातो. शिवाय कॅन्सर सेंटरलाही मशिनरी दिलेली आहे, त्याचा उपयोग हॉस्पिटल मध्ये कॅन्सर रुग्णांना होत आहे. स्वयंम, अंकुर, तनिष्क, चेतना या शाळेतील मुलांसाठीही स्टॉल देण्यात आले आहेत.
या प्रदर्शनासाठी क्लबच्या अध्यक्षा रो. सविता पदे, यामिनी चेअरमन, डॉ. हेमलता कोटकर, सेक्रेटरी सीमा मलाणी, रो. साधना घाटगे, रो. शोभा तावडे याचबरोबर यामिनीच्या सदस्य रो गिरिजा कुलकर्णी, रो. रेणुका सप्रे, रो. दीपिका कुंभोजकर, रो. कल्पना घाडगे, रो. सुप्रिया डोइजड, रो. प्रिया आरगे, रो मेघना शेलके, रो. योगिनी कुलकर्णी, रो. जया महेश्वरी, रो. रेखा सारडा, रो. सुजाता लोहिया त्याचबरोबर सर्व क्लब मेंबर्सनी अथक परिश्रम घेतले आहे.
हे प्रदर्शन २६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४ ते रात्री ९ आणि २७ व २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत सुरु राहणार आहे. तरी सर्व कोल्हापूरवासीयांनी या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.